सेंचुरियन: सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असणारी भारतीय टीम आज दुसरा टी20 सामना खेळणार आहे.


टीममध्ये होणार हे बदल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय टीममध्ये आज काही बदल होण्याची शक्यता आहे. सुपरस्पोर्ट पार्कची पिच या संपूर्ण सिरीजमध्ये खूप धिमी गतीची होती. हे लक्षात घेऊनच भारत अंतिम ११ मध्ये २ स्पिनर्सला घेऊ शकतो. चायनामॅन कुलदीप यादवला अंतिम ११ मध्ये संधी मिळू शकते. स्पिनर अक्षर पटेलला देखील अजून संधी मिळालेली नाही. त्याच्या नावाचा देखील आज विचार होऊ शकतो.


रैनाच्या निर्णयावर सर्वच हैराण


मागच्या सामन्यात सुरेश रैनाला तिसऱ्या स्थानावर पाठवण्यात आलं होतं. यानंतर अनेक जण हैराण झाले होते. आज जर कोहली खेळला तर काय आज पण रैना तिसऱ्या स्थानावर येणार का हे पाहावं लागेल. जोहान्सबर्गमध्ये टीम मॅनेजमेंटला वाटलं होतं की हा मोठा स्कोरचा सामना होऊ शकतो त्यामुळे रैनाला पावरप्लेमध्ये पाठवण्यात आलं होतं.


मध्यक्रम चिंतेचा विषय


भारतासाठी खालचा मध्यक्रम थोडा चिंतेचा विषय आहे. टीम मॅनेजमेंटने महेंद्र सिंग धोनीवर आपला विश्वास कायम ठेवला आहे. धोनी देखील वरच्या फळीत फलंदाजीसाठी इच्छूक नाही दिसत. कोहली चौथ्या क्रमाकांवर आल्याने खालच्या मध्यक्रमला देखील थोडं वजन येतं.