Rohit Sharma: स्पेलिंग चेक करा...; विराटच्या प्रश्नावर रोहित शर्माचं भलतंच उत्तर
Rohit Sharma: मैदानात फिल्डींग करणं असो किंवा सामन्यापूर्वीच प्रेस कॉन्फ्रेंस असो, रोहित शर्माचा मस्करी करण्याचा स्वभाव काही जात नाही. असाच आता एक किस्सा समोर आला आहे
Rohit Sharma: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया सध्या इंग्लंडविरूद्ध टेस्ट सिरीज खेळतेय. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा हिटमॅनच्या नावाने प्रसिद्ध आहे. हिटमॅनची मस्करी करण्याची सवय आता जणू आता सर्वांनाच माहिती झालीये. अशीच आता एक जुनी गोष्ट पुन्हा समोर आलीये. ज्यामध्ये रोहित शर्माने कोहली संदर्भातील एक प्रश्नावर ‘स्पेलिंग चेक करा’असं म्हटलं होतं.
मैदानात फिल्डींग करणं असो किंवा सामन्यापूर्वीच प्रेस कॉन्फ्रेंस असो, रोहित शर्माचा मस्करी करण्याचा स्वभाव काही जात नाही. असाच आता एक किस्सा समोर आला आहे, ज्यामध्ये रोहित शर्माचे एक गमतीदार स्वभाव समोर आला आहे. जेव्हा एका क्रिकेट चाहत्याने रोहित शर्माला विराट कोहलीबद्दल प्रश्न विचारला तेव्हा तो मजेशीरपणे म्हणाला - 'स्पेलिंग तपासा.
असं का म्हणाला रोहित शर्मा?
2020 मध्ये ही घटना घडली होती. ज्यावेळी कोविडमुळे सर्व प्रकारचं क्रिकेट काही काळ बंद होतं. दरम्यान यावेळी अनेक खेळाडू सोशल मीडियाद्वारे त्यांच्या चाहत्यांसोबत जोडले जात होते. अशातच रोहित शर्मा सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह होता आणि यावेळी त्याने सहकारी क्रिकेटपटू आणि चाहत्यांसह ऑनलाइन प्रश्न-उत्तर सेशन देखील घेतली होती.
याचवेळी एक चाहत्याने रोहितला विचारलं की, विराट कोहलीबाबत एका शब्दात काय म्हणशील? या प्रश्नाला उत्तर देताना रोहितने म्हटलं होतं की, स्पेलिंग चेक करा...! चाहत्याने प्रश्न विचारताना विराट कोहलीच्या नावाची स्पेलिंग चुकीची लिहीली होती.
तिसऱ्या टेस्टसाठी टीम इंडिया तयार
सध्या भारतात इंग्लंड विरूद्ध 5 टेस्ट सामन्यांची सिरीज खेळवली जातेय. या सिरीजमध्ये दोन्ही टीम्सने 1-1 सामना जिंकला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला दुसऱ्या टेस्ट सामन्यात विजय मिळवणं शक्य झालं. यानंतर 15 फेब्रुवारीपासून टीम इंडियाला राजकोटमध्ये तिसरी टेस्ट खेळायची आहे.
तिसऱ्या टेस्टसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह, यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल, केएस भरत, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप, देवदत्त पडिक्कल.