मुंबई : आयपीएल २०१९च्या अंतिम सामन्यात खऱ्या अर्थाने क्रीडा रसिकांचं मनोरंजन झालं. प्रत्येक विकेट आणि धाव ही दोन्ही संघांसाठी तितकीच आवश्यक होती. अशा या समामन्यात ज्यावेळी मुंबईच्या संघाने दिलेल्या १५० धावांचा पाठलाग करण्यासाठी चेन्नईचा संघ मैदानात उतरला तेव्हा सुरुवातीला मुंबईच्या खेळाडूंना त्यांच्याकडून तगडं आव्हान देण्यात आलं. पण, काही विकेट्सच्या बळावर मुंबईचा संघ पुन्हा सामन्यातच तग धरु पाहात होता. तोच आणखी एक थरारनाट्य या सामन्यात पाहायला मिळालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलच्या अंतिम सामन्यातील हे थरारनाट्य होतं महेंद्रसिंह धोनीच्या विकेटचं. चेन्नईच्या संघाचील सुरुवातीची फळी तंबूत परतल्यानंतर धोनी फलंदाजीसाठी आला. पण, तेराव्या षटकात त्यालाही परतीची वाट दाखवण्यात आली. ओव्हर थ्रोच्या बळावर त्याला धावबाद करण्यात आलं होतं. अतिशय निर्णायक प्रसंगी धोनी नेमका बाद आहे की नाही हे ठरवण्यासाठी टीव्ही अंपायर निगेल लाँग यांनीही बराच वेळ घेतला. त्याच्या या विकेटविषयी काहीच स्पष्ट होत नसल्यामुळे अखेर रिप्लेची मदत घेत तो बाद असल्याचा निर्णय देण्यात आला. 





शॉर्ट बॉलवर वॉटसनने मलिंगाच्या डाव्या बाजूच्या दिशेने मारला. त्याचवेळी मलिंगाने हा चेंडू गोलंदाजाच्या दिशेने फेकला. पण, मिसफिल्ड झालेल्या या चेंडूला घेत किशनने थेट तो विकेटवर मारता आणि धोनी धावबाद झाल्याचं अपील झालं. धोनी बाद झाल्याचा निर्णय देण्यात आला खरा. पण, त्यात एका दिशेने त्याची बॅट ही रेषेवर असल्याचं दिसत होतं. दुसऱ्या दिशेने पाहिलं असता त्याच्या बॅटचा काही भाग रेषेपलीगडे गेल्याचं दिसत होतं. ज्यामुळे धोनी नेमका बाद होता, की नव्हता असाच प्रश्न सोशल मीडियावर अनेकांनी उपस्थित केला. 




धोनीला बाद ठरवण्यात आलं खरं पण, त्यानंतरल मात्र सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ पाहता धोनीविषयीचा हा निर्णय चुकीचा असल्याचीच प्रतिक्रिया अनेकांनी दिली होती. अनेक चाहतच्यांनी तर या निर्णयावर प्रश्नही उपस्थित केला. त्यामुळे या सामन्याविषयी काहींनी विशेषत: धोनी आणि चेन्नईच्या संघाच्या समर्थकांनी नाराजीचा सूर आळवला.