मुंबई : चेन्नई टीमच्या मागचं ग्रहण संपत नाही. आयपीएलच्या सुरुवातीपासून चेन्नईचा परफॉर्मन्स खूप जास्त डाऊन आहे. चारही सामने चेन्नईने गमवाले आहेत. जडेजाकडे कर्णधारपद आल्यापासून त्याला एकाही सामन्यात विजय मिळवण्यात यश आलं नाही. आता त्यामध्ये टेन्शन वाढवणारी बातमी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेगवान गोलंदाज दीपक चाहर दुखापतीमुळे आयपीएलचे सुरुवातीचे सामने खेळू शकला नाही. तो येईल अशी आशा होती मात्र निराशाच येऊ शकते. दीपक चाहर अजून पूर्ण फीट झाला नाही. कदाचित तो आयपीएलमधून पूर्ण बाहेर जाण्याची शक्यता आहे. 


चेन्नईनं दीपक चाहरला 14 कोटी रुपये देऊन टीममध्ये घेतलं होतं. मात्र त्याला दुखापत झाली. त्यामुळे सुरुवातीचे सामने तो खेळू शकला नाही. आता दीपक चाहर पूर्ण आयपीएलच टीमबाहेर राहण्याची शक्यता आहे. याबाबत चेन्नईकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.


चेन्नई सुपरकिंग्स टीमला दीपक चाहरची मोठी उणीव भासत असल्याचं दिसत आहे. यावेळी चेन्नई टीम चांगल्या फॉर्ममध्ये नाही. राजस्थान, पंजाब, लखनऊ टीममध्ये चुरस आहे. तर चेन्नई आणि मुंबई टीम चारही सामने पराभूत झाल्या आहेत.