CSK vs LSG: धोनीचा एक निर्णय अन् चेपॉकवर चेन्नईने उघडलं खातं, 12 रन्सने उडवला लखनऊचा धुव्वा!
Chennai Super Kings vs Lucknow Super Giants: चेन्नईच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात अखेर चेन्नईने बाजी मारली आहे. चेन्नई सुपर किंग्जने लखनऊ सुपर जायन्ट्सचा 12 धावांनी पराभव केला. त्यामुळे चेन्नईने विजयाचं खात उघडलं आहे.
CSK vs LSG, IPL 2023, Match 6: चेन्नईच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात अखेर चेन्नईने (Chennai Super Kings) बाजी मारली आहे. चेन्नई सुपर किंग्जने लखनऊ सुपर जायन्ट्सचा (Lucknow Super Giants) 12 धावांनी पराभव केला. त्यामुळे चेन्नईने विजयाचं खात उघडलं आहे. यंदाच्या हंगामातील (IPL 2023) चेन्नईचा हा पहिला विजय आहे. आजच्या सामन्यात चेन्नईच्या संघाने एकजुटीने खेळ केला. त्याचा परिणाम पहायला मिळत आहेय. प्रथम फलंदाजी आणि नंतर गोलंदाजीत देखील धार दिसून आली. (Chennai Super Kings beat Lucknow Super Giants 12 by runs in 6th match of IPL 2023)
प्रथम फलंदाजी करत चेन्नईने वादळी सुरूवात केली. ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि डेविन कॉन्वेने (Conway) शतकीय भागेदारी केली. ऋतुराजने 31 चेंडूचा सामना करत 57 धावांची धुंवाधार खेळी केली. त्यात त्याने 3 फोर तर 4 गगनचुंबी षटकार खेचले. तर कॉन्वेने 29 बॉलमध्ये 47 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या शिवम दुबेने तीन सिक्स खेचले आणि सामना रंगात आणला. रायडूने देखील हात साफ करून घेतले. त्याने 14 बॉलमध्ये 27 धावा केल्या. चेन्नईच्या संघाला धोनीच्या फिनिशिंगचा टच मिळाला. सलग दोन सिक्स खेचत धोनीने संघाला 217 पर्यंत पोहोचवलं. मात्र, मार्क वूडने धोनीची विकेट काढली. मार्क वूडने 3 तर रवी बिश्नोई देखील 3 विकेट पटकावल्या.
चेन्नईने दिलेल्या 218 धावांचं आव्हान पार करताना लखनऊने चांगली सुरुवात केली. मागील सामन्यात फिफ्टी मारणाऱ्या काइय मेयर्सने पुन्हा एकदा लखनऊच्या संघाला तारलं. त्याने 22 चेंडूत 53 धावांची वादळी खेळी केली. त्यात 2 गगनचुंबी सिक्सचा समावेश आहे. एकीकडे मेयर्स खेळत असताना दुसऱ्या बाजूने लखनऊच्या विकेट्स जात होत्या. त्यावेळी निकोलस पूरनने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. त्याने 18 बॉलमध्ये 32 धावांची खेळी केली.
दरम्यान, अखेरच्या दोन ओव्हरमध्ये लखनऊला 38 धावांची गरज होती. त्यावेळी धोनीने युवा राजवर्धन हंगरगेकरच्या याच्या हातात बॉल सोपवला. हंगरगेकर ओव्हर चेन्नईच्या पारड्यात पडली. त्यामुळे हंगरगेकर धोनीच्या भरोश्याचा गोलंदाज झाल्याची चर्चा सुरू आहे. तर अखेरची ओव्हर तुषार देशपांडेला देऊन धोनीने खेळ संपवला.