मुंबई : एमएस धोनी (Dhoni) याची क्रेझ त्याच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचबरोबर धोनीही चाहत्यांना आश्चर्यचकित करण्यात कोणतीही कसर सोडत नाही. आता माहीचे चाहते IPL 2022 मध्ये त्याची झलक पाहण्यासाठी आसुसले आहेत. मात्र सीझन सुरू होण्यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) थाला नव्या अवतारात दिसला आहे. CSK ची पिवळी जर्सी घालण्यापूर्वी धोनी नवीन आणि मजेदार लूकमध्ये दिसला. (MS Dhoni NEw Look Viral)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरवर्षी IPL सुरू होण्यापूर्वी एमएस धोनीचा पूर्णपणे वेगळा लूक समोर येतो. गेल्या सीझनमध्ये या दिग्गज खेळाडूचा लूक चांगलाच व्हायरल झाला होता. आता आयपीएलच्या प्रसारणापूर्वी, ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कने छोटे व्हिडिओ जारी केले आहेत. या व्हिडिओंमध्ये एमएस धोनी पूर्णपणे नवीन रूपात दिसत आहे.



IPL 2022 च्या प्रमोशनसाठी स्टार स्पोर्ट्सने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये महेंद्रसिंह धोनी बस ड्रायव्हरच्या लूकमध्ये दिसत आहे. खाकी रंगाच्या पोशाखात धोनी एकदम डॅशिंग दिसत आहे. यासोबतच पिवळा चष्मा आणि मोठ्या मिशा या रूपात दिसत आहे.


IPL 2022 मध्ये देखील महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. गेल्या मोसमातही धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने चौथ्यांदा विजेतेपद पटकावले होते. आता आयपीएल 2022 च्या लिलावापूर्वी, CSK फ्रँचायझीने धोनीला 12 कोटी रुपयांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर कायम ठेवले. आता धोनीच्या नजरा पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्यावर असतील.



यंदा आयपीएल 2022 मध्ये 10 संघ (10 Teams) सहभागी होणार आहेत. त्यामुळे या स्पर्धेच्या साखळी फेरीचे स्वरूप बदलण्यात आले आहे. नवीन स्वरूपानुसार, भारतीय क्रिकेट बोर्डाने 10 संघांची 5-5 गटात विभागणी केली आहे. मागील सर्व हंगामांप्रमाणे या हंगामात देखील प्रत्येक संघ साखळी फेरीत 14 सामने खेळणार आहे. यासाठी प्रत्येक संघाला 5 संघांसोबत दोनदा आणि इतर 4 संघांशी एकदा सामना खेळावा लागेल. दोन्ही गटातील संघांचे विजेतेपद आणि खेळलेले अंतिम सामने यानुसार वर्गीकरण केले जाते.