मुंबई : आयपीएलमध्ये संधी मिळाली नाही पण पुजाराची बॅट काउंटीमध्ये चालली. गेल्या दीड वर्षांपासून टीम इंडियासाठी बॅट चालली नाही पण काउंटीमध्ये चालली. काउंटीमध्ये पुजाराने उत्तम कामगिरी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलमध्ये काउंटीमध्ये पुजाराने खूप चांगल्या धावा केल्या. तीन मॅचमध्ये त्याने द्विशतक झळकवलं आणि एक शतकही झळकवलं आहे. पुजाराची वा वा होत आहे. मॅचनंतरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


मॅच संपल्यानंतर चेतेश्वर पुजाराच्या मुलीसोबत सेलिब्रेशन करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पुजाराची पत्नी पूजा आणि मुलगी आदिती सध्या इंग्लंडमध्ये आहेत. त्यांच्यासोबत पुजाराने खास आनंद साजरा केला. 


पुजाराने आपल्या अकाउंटवर खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आदिती पुजाराशी हात मिळवत असल्याचं दिसत आहे. पुजाराने यापेक्षा आणखी सुंदर काय? असं कॅप्शन देऊन व्हिडीओ शेअर केला आहे. 


पुजाराचा आताचा फॉर्म पाहता पुन्हा एकदा त्याला टीम इंडियातून खेळण्याची संधी मिळणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुजाराच्या या क्युट व्हिडीओची सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली आहे.