India vs West Indies Series: येत्या जुलै महिन्यात टीम इंडियाला वेस्ट इंडिजचा दौरा करायचा आहे. या दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. यामध्ये मराठमोळा खेळाडू अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर उप कर्णधारपदाची मोठी जबाबदारी देण्यात आलीये. तर दुसरीकडे चेतेश्वर पुजाराला ( Cheteshwar Pujara ) मात्र बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय. यानंतर चेतेश्वर पुजाराच्या वडिलांनी याबाबत मोठं विधान केलंय. 


वेस्ट इंडिज दौऱ्यातून पुजारा आऊट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडियाचे खेळाडू फ्लॉप झाले. काऊंटीमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या चेतेश्वर पुजारालाही ( Cheteshwar Pujara ) चांगली कामगिरी करता आली नाही. पुजाराच्या खराब कामगिरीनंतर त्याला टेस्टमधून बाहेर काढलं. यावेळी पुजाराचे वडील अरविंद पुजारा यांना खात्री आहे की, त्यांचा मुलगा पुन्हा एकदा नक्कीच टेस्ट टीममध्ये कमबॅक करेल. 


चेतेश्वर पुजाराचे ( Cheteshwar Pujara ) वडील म्हणाले की, 'तो मानसिकदृष्ट्या खूप स्ट्रॉंग आहे. मी या सिलेक्शनवर भाष्य करू शकत नाही. पण मी जे पाहिले त्यावरून तो सर्वोत्तम फलंदाजी करतोय. वेस्ट इंडिज टीमची घोषणा झाल्यानंतर त्याच दिवशी तो नेटमध्ये मेहनत करत होता. त्यामुळे तो पुन्हा एकदा नक्कीच कमबॅक करेल.


दीर्घकाळापासून पुजाराचा खराब खेळ सुरु


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पुजाराला चांगला खेळ करता आला नाही. जानेवारी 2019 पासून गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्याने बांगलादेशविरुद्ध नाबाद 102 रन्सची खेळी केली. त्यावेळी ते पुजाराचं ( Cheteshwar Pujara ) 1443 दिवसांनंतरचं टेस्ट मधील शतक होतं. मधल्या काळात पुजाराला अनुभवाच्या जोरावर संधी मिळताना दिसली. 


सुनील गावस्कर यांची टीका


पुजाराला ( Cheteshwar Pujara ) डावलल्यानंतर सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar ) म्हणाले की, फलंदाजांच्या अपयशासाठी पुजाराला बळीचा बकरा का बनवलं जातंय? तो भारतीय टीमचा एका विश्वासू खेळाडू आहे. फरक इतकाच आहे की, त्याचे इतर खेळाडूंप्रमाणे लाखो फॉलोअर्स नाहीत जे त्याच्या बाजूने आरडाओरड करतील. त्याला संघाबाहेर ठेवण्याचा आणि इतरांना संधी देण्याचा नेमका मापदंड काय आहे? हे मला अजून समजलेलं नाही. 


वेस्ट इंडिड विरूद्ध कशी असेल टीम इंडिया


रोहित शर्मा ( कर्णधार ), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, अजिंक्य रहाणे ( उपकर्णधार ), केएस भरत ( विकेटकीपर ), इशान किशन ( विकेटकीपर ), आर अश्विन, आर जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल , जयदेव उनाडकट, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार