Cheteshwar Pujara : टेस्ट टीम इंडियाचा महत्त्वाचा खेळाडू मानला जाणारा चेतेश्वर पुजारा  (Cheteshwar Pujara) सध्या उत्तम फॉर्ममध्ये आहे. त्याने श्रीलंकेविरूद्धच्या (IND vs SL) पहिल्या सामन्यामध्ये त्याने शतक ठोकलं होतं. पुजाराने 130 बॉल्समध्ये 102 रन्सची खेळी केली होती. त्याच्या या खेळीमध्ये 13 फोर्सचा समावेश होता. अशातच पुजारा चांगल्या फॉर्ममध्ये असताना काऊंटी क्रिकेटमधून (County Cricket) एक मोठी बातमी समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, चेतेश्वर पुजारा यावर्षी म्हणजेच 2023 मध्ये काऊंटी क्रिकेट खेळताना दिसणार आहे. त्यामुळे पुजारा आता टीम इंडियाला अलविदा म्हणणार का? असा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. 


स्टीव स्मिथ आणि Cheteshwar Pujara एकत्र खेळणार 


इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या काऊंटी क्रिकेटमध्ये  (County Cricket) स्टीव स्मिथ (Steve Smith) आणि चेतेश्वर पुजारा एकत्र खेळताना दिसणार आहेत. 2023 मध्ये ससेक्स (Sussex) टीमसोबत पुजारा खेळणार आहे. मुख्य म्हणजे पुजारा, गेल्या वर्षीच या टीमसोबत जोडला गेला आहे.


या काळात पुजाराने उत्तम फलंदाजी करत काऊंटी चॅम्पियनमध्ये 1000 रन्स करत चाहत्यांची मनं जिंकली होती. यामध्ये 3 द्विशतकांचा समावेश आहे. यावेळी पुजाराने 109.4 च्या सरासरीने खेळी केली होती. 


ससेक्स क्रिकेटच्या सीईओंची प्रतिक्रिया  


ससेक्सने ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथने करारावर स्वाक्षरी केल्याची माहिती दिली आहे. तो 2023 मध्ये ससेक्स टीमसोबत खेळताना दिसणार आहे. तर पुजाराला परदेशातील करारांतर्गत कायम ठेवण्यात आल्याची माहिती आहे. यावर ससेक्स क्रिकेटचे सीईओ रॉब एंड्रयूने प्रतिक्रिया दिलीये.


रॉब एंड्रयू यांच्या सांगण्यानुसार, आम्ही मे महिन्यात काऊंटी चॅम्पियनच्या सामन्यांसाठी स्टीव स्मिथला खेळवण्यासाठी उत्सुक आहोत. एशेज सिरीजपूर्वी ससेक्ससाठी जगातील सर्वोत्तम फलंदाज आमच्यासाठी खेळणं ही आनंदाची बाब आहे.