Pat Cummins Presented Jersey To Cheteshwar Pujara: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जात असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये (Border–Gavaskar Trophy) भारत 2-0 ने अभेद्य आघाडीसह पुढे आहे. सध्या सुरू असेलला सामना हा चेतेश्वर पुजाराचा 100 वा कसोटी सामना (Cheteshwar Pujara 100th Test) आहे. सामन्यापूर्वी DDCA कडून खास कॅप देऊन चेतेश्वर पुजाराचा सत्कार करण्यात आला. कसोटी कारकिर्दीत शंभर वेळा मैदानात उतरणारा 13 वा भारतीय ठरलाय. त्यामुळे त्याचं कौतूक होताना दिसतंय. 


कमिन्सने दिलं पुजाराला गिफ्ट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकीकडे भारताने सामना जिंकला असला तरी मन मात्र, ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टनने जिंकलं आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने (Pat Cummins) रविवारी नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर (Delhi Test) दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसानंतर पुजाराच्या 100व्या कसोटी सामन्याच्या स्मरणार्थ चेतेश्वर पुजाराला स्वाक्षरी (Cheteshwar Pujara receives priceless gift) केलेली जर्सी भेट दिली.


पाहा ट्विट  - 



ऑस्ट्रेलियाच्या संघाच्या सर्व खेळाडूंची यावर स्वाक्षरी होती. मैदानात खुन्नस देणाऱ्या पॅट कमिन्सचं ड्रेसिंग रूममध्ये (Dressing Rooms) प्रेम दिसून आलं. पॅट कमिन्सच्या खेळवृत्तीचं प्रदर्शन पहायला मिळालं आहे. त्यामुळे क्रिडाविश्वास ऑस्ट्रेलियन संघाचं कौतूक होताना दिसतंय.


आणखी वाचा - Sanju Samson करणार टीम इंडियाला 'टाटा गुड बाय'? आता 'या' टीमकडून खेळण्याची शक्यता!


ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का


अशातच आता ऑस्ट्रेलियन संघ (Team Australia) अडचणीत सापडलेला असताना ऑस्ट्रेलिचा कर्णधार पॅट कमिन्स (Australian captain Pat Cummins) अचानक मायदेशी परतला आहे. कमिन्सच्या अचानक मायदेशी परतण्यामागे वैयक्तिक कारणं सांगितली जात आहेत. पॅट कमिन्स इंदूरमध्ये 1 मार्चपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीपूर्वी परतणार आहे. जर पॅट कमिन्स तिसऱ्या कसोटीपूर्वी भारतात परतला नाही तर इंदूर कसोटी सामन्यात स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) ऑस्ट्रेलियाची कमान सांभाळू शकतो.