मुंबई : भारताचा क्रिकेटर चेतेश्वर पुजाराच्या घरी छोट्या परीचे आगमन झालेय. चेतेश्वरची पत्नी पुजा डाबरीने २२ फेब्रुवारीला मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर काही तासांतच पुजाराने आपल्या मुलीसोबतचा पहिला फोटो ट्विटरवर शेअर केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा फोटो शेअर करताना चेतेश्वर म्हणाला, छोट्या परीचे स्वागत आहे...आयुष्यातील नव्या भूमिकेसाठी मी उत्साही आहे. आम्ही एक विश मागितली होती जी पूर्ण झाली. 


चेतेश्वरचा फोटो तीन तासांतच व्हायरल झालाय. तसेच या फोटोला ४ हजाराहून अधिकांनी लाईक्सही केलेय. चेतेश्वरच्या चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्यात. 



३१ डिसेंबर २०१७मध्ये पुजाराने ट्विट करताना म्हटले होते, पुढील वर्षी आमच्या आनंदाचा खजिना उघडण्याची वाट बघतोय. येणारे वर्ष सगळ्यांना आनंदाचे आणि सुखाचे जावो. ही कॅप्शन देताना पुजाराने आपल्या प्रेग्नंट बायकोचा फोटोही शेअर केला होता.