डबल सेन्चुरी ठोकून पुजारानं तोडला ७० वर्षांचा रेकॉर्ड
रणजी ट्रॉफीच्या यंदाच्या सीझनमध्ये आत्तापर्यंत फ्लॉप ठरलेल्या टीम इंडियाचा बॅटसमन चेतेश्वर पुजारानं फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये मात्र इतिहास रचलाय.
मुंबई : रणजी ट्रॉफीच्या यंदाच्या सीझनमध्ये आत्तापर्यंत फ्लॉप ठरलेल्या टीम इंडियाचा बॅटसमन चेतेश्वर पुजारानं फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये मात्र इतिहास रचलाय.
सौराष्ट्रचा कॅप्टन असलेला पुजारानं झारखंडविरुद्ध ग्रुप बीच्या मॅचमध्ये २०४ रन्सची दमदार खेळी केली. यासोबतच आत्तापर्यंत पुजारा सर्वात जास्त वेळा डबल सेन्चुरी ठोकरणारा खेळाडू बनलाय. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पुजारानं आत्तापर्यंत १२ डबल सेन्चुरी ठोकल्यात...
उल्लेखनीय म्हणजे, आत्तापर्यंत कोणत्याही भारतीय खेळाडूनं फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये १२ डबल सेन्चुरी ठोकलेल्या नाहीत.
यापूर्वी सर्वात जास्त डबल सेन्चुरी ठोकण्याचा रेकॉर्ड विजय मर्चेंटच्या नावावर होता. त्यानं आपल्या करिअरमध्ये ११ डबल सेन्चुरी ठोकल्या होत्या. तब्बल ७० वर्षानंतर पुजारा हा रेकॉर्ड तोडण्यात यशस्वी झालाय.