Cheteshwar Pujara : काउंटी सामन्यातून चेतेश्वर पुजाराचं निलंबन, वाचा नेमकं कारण काय?
County Championship Game : ससेक्स काउंटी क्रिकेट क्लबचा विद्यमान कर्णधार चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यावर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) एका सामन्याची बंदी घातली आहे.
Cheteshwar Pujara suspended by ECB : ससेक्स काउंटी क्रिकेट क्लबचा विद्यमान कर्णधार चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यावर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) एका सामन्याची बंदी घातली आहे. भारतीय फलंदाज पुजारावर त्याच्या संघाने नियमांचं उल्लंघन केल्यामुळे त्याच्यावर ही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता चेतेश्वर पुजारा आगामी सामन्यात खेळू शकणार नाही. काउंटी चॅम्पियनशिप 2023 मध्ये ससेक्स काउंटी क्रिकेट क्लबच्या खात्यातून 12 गुण देखील कापले गेले आहेत. (Cheteshwar Pujara suspended by ECB for County Championship game know the reason)
यंदाच्या मोसमात चौथ्यांदा दंड आकारल्यामुळे ससेक्सविरुद्ध ही कारवाई करण्यात आली. संघाचा कर्णधार चेतेश्वर पुजाराने कोणताही युक्तिवाद न करता आरोप मान्य केले आहेत. चेतेश्वर पुजारा याच्यासह आचारसंहितेच्या उल्लंघनासाठी जबाबदार असलेले टॉम हेन्स, जॅक कार्सन आणि एरी कार्वेलास हे खेळाडू आगामी सामन्यात संघाचा भाग असणार नाहीत.
टॉम हेन्स याने यापूर्वी विरोधी फलंदाज बाद झाल्यानंतर 'सेंड-ऑफ' दिल्याबद्दल ताकीद देण्यात आली होती, हीच कृती त्याने लीसेस्टरशायरच्या सामन्यादरम्यान पुन्हा एकदा केली. जॅक कार्सनने लीसेस्टरशायरच्या सामन्यादरम्यान विरोधी फलंदाजाला अडथळा आणल्याचं आढळून आलं. सामन्यादरम्यान ससेक्सच्या एकूण वर्तनावर पंच स्पष्टपणे नाराज होते, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. पुजाराने स्वतः कोणताही गुन्हा केला नसला तरी या घटनांदरम्यान कर्णधार म्हणून त्याच्या भूमिकेमुळे त्याला निलंबित करण्यात आलंय.
दरम्यान, काऊंटी चॅम्पियनशिप 2023 मध्ये ससेक्स काउंटी क्रिकेट क्लबच्या खात्यातून 12 गुण वजा झाल्यानंतर, संघ आता 124 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावरून पाचव्या स्थानावर घसरला आहे.