Indvs Ban :  भारत आणि बांगलादेशमधील पहिल्या कसोटी सामन्यावर (Indvs Ban first test Match) भारताने आपली पकड मजबूत केली आहे. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 404 धावा केल्या होत्या. त्यानंतर बांगलादेशचा संघ 150 धावांवर गुंडाळला. (Cheteshwar Pujara fastest century) भारताने दुसरा डाव विराट कोहली (Virat Kohli) नाबाद 19 आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) नाबाद 102 असताना 258 धावांवर घोषित केलाय. बांगलादेशला जिंकण्यासाठी 512 धावांचं आव्हान आहे. (Cheteshwar Pujara century vs Bangladesh)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या डावामध्ये भारताकडून चेतेश्वर पुजाराने सर्वाधिक 90 धावा केल्या होत्या. अवघ्या 10 धावांनी पुजाराचं शतक हुकलं होतं. दुसऱ्या डावामध्ये त्याने शतक झळकवत पुजाराने भारताला आणखी मजबूत स्थितीत नेलं. पुजाराने त्याचं कारकिर्दीतील 18 वे शतक पूर्ण केलं. चेतेश्वर पुजाराने नाबाद 120 आणि शुभमन गिल 110 धावा केल्या. पुजाराचा शतकाचा दुष्काळ संपला. 18 व्या शतकासाठी 
त्याला तब्बल 3 वर्षे 11 महिने आणि 13 दिवसांची प्रतिक्षा करावी लागली. पुजाराने शेवटचं शतक हे 3 जानेवारी 2019 ला ऑस्ट्रेलियाविरूद्ध केलं होतं. 193 धावांची खेळी केली होती मात्र हा सामना रद्द झाला होता. 


चेतेश्वर पुजाराचं 18 शतक हे खास आहे. पुजाराचं18 वं शतक हे त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वेगवान शतक ठरलं आहे. पुजाराने 130 चेंडूत 102 धावा केल्या आहेत. या खेळीमध्ये त्याने 13 चौकार मारले, युवा शुभमन गिलनेही आपलं पहिलं शतक झळकवलं आहे. 152 चेंडूंमध्ये 110 धावांची खेळी केली. कसोटीत विजय मिळवण्यासाठी भारताला बांगलादेशला ऑल आऊट करायचं आहे. 


दरम्यान, भारताच्या गोलंदाजांना दुसऱ्या डावात एकही विकेट मिळाली नाही. बांगलादेशने दुसऱ्या डावात सावध सुरूवात केली आहे. शांटो आणि हसन यांनी तिसऱ्या दिवसाखेर 42 धावा केल्या आहेत.