डरहॅम : डरहॅमच्या मैदानावर इंग्लंडविरुद्धच्या टी -२० सामन्यादरम्यान या कॅरेबियन फलंदाजाने आंतरराष्ट्रीय टी -२० सामन्यात १०० षटकारांचा विक्रम नोंदविला आहे. टी २० इंटरनॅशनलमध्ये १०० षटकार मारणारा ख्रिस गेल जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने हा रेकॉर्ड आपल्या ५२ व्या टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यात नोंदवला आहे.
 
ख्रिस गेलने इंग्लंडविरुद्ध डरहॅमच्या मैदानावर खेळलेल्या सामन्यात डावखुरा वेगवान गोलंदाज डेव्हिड व्हिलेचा चेंडूला षटकार खेचला आणि त्याच्या नावावर रेकॉर्ड तयार झाला. या सामन्यात गेलने केवळ २१ चेंडूत ४० धावा केल्या. या खेळादरम्यान त्याने तीन चौकार व ४ षटकार खेचले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमध्ये १०० षटकार मारणारा गेल हा एकमेव खेळाडू आहे. भविष्यकाळात यापेक्षाही जास्त फलंदाज येतीलच हा रेकॉर्ड सध्या तरी गेलच्याच नावावर आहे.


इथेही 'गेल' बेस्ट


आयपीएल, सीपीएल, बिग बॅश लीग आणि या सर्व टी -२० स्पर्धांमध्ये गेल अनेक क्रिकेट लीगमध्ये खेळत असतो. या सर्व स्पर्धा एकत्रितपणे गेलने ३०९ टी २० सामन्यांत ७७२ धावा केल्याआहेत. बाकीच्या खेळाडूंपेक्षा तो खूपच पुढे निघून गेला आहे. किरॉन पोलार्डने ३८९ टी २० सामन्यांत ४९६ सिक्सर मारले आहेत आणि या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.