लहानपणी कचरा वेचायचा हा धडाकेबाज क्रिकेटर
आज आहे जगातील सर्वात धडाकेबाज क्रिकेटर
मुंबई : जगभरात आज क्रिकेट सगळीकडे पोहोचलंय. भारतात याचं क्रेझ मोठ्या प्रमाणात आहे. आज क्रिकेटमध्ये अनेक युवा आपलं करिअर करण्यासाठी येत आहेत. क्रिकेटमध्ये आज प्रसिद्धी शिवाय पैसा देखील मोठ्या प्रमाणात आहे. आज आम्ही तुम्हाला एका अशा क्रिकेटर बद्दल सांगणार आहोत जो एकेकाळी आपल्या कुटुंबासाठी कचरा आणि प्लास्टीक वेचायचा. अनेक अडचणींमधून आज तो जगभरात मोठा क्रिकेटर बनला आहे.
कोण आहे तो खेळाडू
वेस्ट इंडिजचा धडाकेबाज क्रिकेटर ख्रिस गेल बद्दल आम्ही बोलतोय. गेलचा जन्म २१ सप्टेंबर १९७९ मध्ये किंग्स्टन जमैकामध्ये झाला होता. आज क्रिकेटच्या जगतात तो मोठं नाव आहे. आज त्याचं अलिशान घर आहे पण त्यासाठी त्याने अडचणींचा सामना केला आहे.
शिक्षणासाठी नव्हते पैसे
गेलने त्याच्या जीवनात खूप वाईट दिवस देखील पाहिले आहेत. गेल एका छोट्याशा घरात राहत होता. शिक्षण देखील त्याला घेता आलं नाही. कारण त्याच्या वडिलांकडे फी भरण्यासाठी पैसे नव्हते. एका मुलाखतीत त्याने म्हटलं होतं की, आपल्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी तो कचरा देखील वेचायचा.
अधिक वाचा - ख्रिस गेलच्या आईवर ही वेळ का आली?