ख्रिस गेलचा संघर्षमय प्रवास, आईने शेंगा विकून वाढवले!

क्रिकेटमधील वादळ म्हणून ख्रिस गेलकडे पाहिले जाते. त्याची तुफान बॅटिंग क्रिकेटच्या मैदानावर वादळ निर्माण करते. त्याचा संघर्षमय प्रवास...

सुरेंद्र गांगण | Updated: Apr 17, 2018, 07:18 AM IST
ख्रिस गेलचा संघर्षमय प्रवास, आईने शेंगा विकून वाढवले! title=

मुंबई : क्रिकेटमधील वादळ म्हणून ख्रिस गेलकडे पाहिले जाते. त्याची तुफान बॅटिंग क्रिकेटच्या मैदानावर वादळ निर्माण करते. प्रथम श्रेणी क्रिकेट असो की टी-२० क्रिकेटमध्ये तो ज्या आवेगाने खेळतो आणि त्याचे फटके क्रिकेट प्रेमींना एक पर्वणी असते. मात्र, ख्रिस गेलचा इतिहात पाहिला तर आश्चर्य करण्याजोगा आहे. त्याला लहानाचा मोठं करताना त्याच्या आईला काय काय करावे लागले, ते तिलाच माहिती. मात्र, त्यातील एक गोष्ट क्रिकेट प्रेमींसाठी आम्ही सांगत आहोत. टी-२०च्या अकाराव्या सीझनला ख्रिस गेलवर बोलीच लागली नाही. त्यामुळे क्रिकेट प्रेमी नाराज झाले होते. मात्र, पंजाबने त्याला संधी दिली आहे. त्या संधीचे त्यांने सोने केलेय. टी-२० क्रिकेट फिव्हर  चढण्यास सुरुवात झालेय. ख्रिस गेल पंजाबकडून खेळत आहे. ख्रिसला अजून खेळण्याची संधी मिळाली नव्हती. पण, १५ एप्रिलला चेन्नई  विरूद्ध पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यात ख्रिसने जोरदार बॅटिंग केली. ३३ चेंडूत ६३ धावा फटकावल्यात. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ बाद १९७ धावा केल्या. गेलनेही त्याला मिळालेल्या संधीचे सोने करत संघाला विजयी केले.

शतक करणारा तो पहिला 

टी-२०मध्ये लोकप्रिय असलेला एक चेहरा म्हणजे ख्रिस गेल होय.ख्रिस वेस्ट इंडिजचा असला तरी त्याच्या क्रिकेटचे चाहते संपूर्ण जगात आहेत. टी-२०मध्ये शतक करणारा तो पहिला फलंदाज आहे. तर आयपीएलमध्ये सर्वात जास्त षटकार (२६५) करणाराही तो पहिला खेळाडू आहे. तसेच तो मैदानावर धम्मालमस्ती करतानाही दिसतो. त्याचा डान्स प्रसिद्ध आहे. एक गेल स्टाईल म्हटले तर योग्य ठरेल. परवा त्याने पंजाबी डान्स केला तोही अभिनेत्री प्रीती झिंटासोबत. अशा या ख्रिस गेलचे जीवन अतिशय खडतर होते. त्यांने परिस्थिवर मात करत इथपर्यंत प्रवास केलाय. 


 

दोनवेळचे जेवणही मिळत नव्हते

ख्रिस गेला आज जी काही प्रसिद्धी मिळत आहे. त्यामुळे त्याचा मोठा संघर्ष आहे. ख्रिसचा जन्म वेस्ट इंडिजमधील किंग्सटनमध्ये २१ सप्टेंबर १९७९ मध्ये झाला. ख्रिसचे लहानपण अनेक अडचणींनी भरलेले होते. त्या दोनवेळचे जेवणही मिळत नव्हते.ख्रिसचे वडिल पोलीस सेवेत होते. तर त्याची आई भुईमुगाच्या शेंगा विकत असे. या दोघांच्या कमाईतून गेल कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालत असे.

गल्लीत क्रिकेट खेळायचा

गंमतीदार गोष्ट म्हणजे ख्रिस गेलही गल्लीत क्रिकेट खेळलाय. त्याची सुरुवातही तशीच झालेय. कारण त्याच्याकडे क्रिकेट खेळण्यासाठी पैसे नव्हते. त्याने स्थानिक क्रिकेट मैदान गाजविण्यास सुरुवात केल्यानंतर त्याचे नाव झाले आणि त्याला जमेका येथील ‘लुकास क्रिकेट क्लब’ जॉईन करण्याची  संधी मिळाली. वयाच्या १९ व्या वर्षीच त्याला प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. 

ख्रिसला संघातून डावले गेले!

गेलला वेस्ट इंडीजकडून खेळण्याची संधी मिळाली. १९९८ मध्ये ख्रिसने त्याचा पहिला वनडे सामना भारताविरोधात खेळला होता.त्यानंतर टेस्ट मॅचमध्ये खेळण्याची संधीही त्याला मिळाली. पण, आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ख्रिसने चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे त्याला संघातून डावले गेले. मात्र, २००२ मध्ये ख्रिसला पुन्हा संधी मिळाली. याचवर्षी त्याने भारताविरूद्धच्या सामन्यात त्रिशतक केले. यानंतर  ख्रिस  गेलचे नाव जगात चमकले. आक्रमक खेळाडू अशी ओळख असलेल्या गेलला २००६ मध्ये ख्रिसला चॅम्पियन ट्रॉफीमध्ये प्लेअर ऑफ द मॅच किताब देण्यात आला. तर २००७ मध्ये टी-२० वर्ल्डकपमध्ये पहिले शतक ठोकले. तो शतक (११७) बनविणारा पहिलाच खेळाडू झाला.