मुंबई : हरियाणाची लोकप्रिय स्टेज डान्सर सपना चौधरीने आता क्रिस गेलची देखील विकेट घेतली आहे. सपना चौधरीचं 'तेरी आंख्या का यो काजल' हे गाणं सध्या अगदी लहानांपासून मोठ्यांच्या तोडांवर आहे. या गाण्याने सपना चौधरीला लोकप्रियता मिळवून दिली. मात्र आता हीची जादू IPL क्रिकेटर्समध्ये देखील पाहायला मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलमध्ये पंजाबकडून खेळणारा क्रिस गेल सपना चौधरीचा जबरा फॅन असल्याच कळत आहे. क्रिस गेल हा आपल्या डान्समुळे कायम चर्चेत असतोच. पण आता त्याने चक्क सपना चौधरीच्या गाण्यावर डान्स केला आहे. क्रिस गेलने तेरी आंख्या का यो काजल या गाण्यावर डान्स केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत क्रिस गेलने चक्क सपना चौधरीच्या स्टेप्स फॉलो केल्या आहेत. 



हा व्हिडिओ पाहताच स्वतः सपना चौधरीने तो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. सपना चौधरीने या व्हिडिओवर इंस्टाग्रामवर लिहिताना म्हटलं की, बघा, मला काय मिळालं क्रिस गेलचा खास डान्स. या व्हिडिओत क्रिस गेल व्हाईट कलरच्या आऊट फिटमध्ये दिसत आहे. क्रिस गेलच्या या डान्सच्या मागे क्रोमा दिसत आहे. त्यामुळे हे निश्चित की या गाण्याचं एक नवं वर्जन आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. क्रिस गेल हा क्रिकेटप्रमाणेच जिम वर्कआऊट, म्युझिक, गिटार आणि डान्स यामध्ये भरपूर रूची ठेवतो. क्रिकेट व्यतिरिक्त तो कायमच वेगवेगळ्या गोष्टी करतो आणि त्या गोष्टी चर्चेत येतात.