मोहाली : यंदाच्या आयपीएलमधलं पहिलं शतक पंजाबच्या क्रिस गेलनं लगावलं आहे. क्रिस गेलनं ६३ बॉल्समध्ये नाबाद १०४ रनची खेळी केली. यामध्ये ११ सिक्स आणि १ फोरचा समावेश होता. गेल्या या खेळीमुळे पंजाबनं हैदराबादपुढे १९४ रन्सचं आव्हान दिलं आहे. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार, राशीद खान आणि सिद्धार्थ कौल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.


लिलावात गेलची विक्री नाही


आयपीएलच्या लिलावामध्ये पहिल्या वेळेला क्रिस गेलला कोणत्याही टीमनं विकत घेतलेलं नव्हतं. पण नंतर पंजाबचा सल्लागार आणि भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागनं गेलला विकत घ्यायचा आग्रह केला. त्यामुळे पंजाबनं गेलला विकत घेतलं.