मोहाली : यंदाच्या आयपीएलमधलं पहिलं शतक पंजाबच्या क्रिस गेलनं लगावलं आहे. क्रिस गेलनं ६३ बॉल्समध्ये नाबाद १०४ रनची खेळी केली. यामध्ये ११ सिक्स आणि १ फोरचा समावेश होता. गेल्या या खेळीमुळे पंजाबनं हैदराबादपुढे १९४ रन्सचं आव्हान दिलं आहे. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार, राशीद खान आणि सिद्धार्थ कौल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.


गेलचा विश्वविक्रम


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावण्याचा विक्रम क्रिस गेलच्या नावावर आहे. गेलनं आत्तापर्यंत टी-20 क्रिकेटमध्ये २१ शतकं झळकावली आहेत. या यादीमध्ये दुसरा क्रमांक न्यूझीलंडच्या ब्रॅण्डन मॅक्कलमचा लागतो. मॅक्कलमनं टी-20 क्रिकेटमध्ये ७ शतकं केली आहेत.


आयपीएलमध्येही गेलची शतकं अधिक


आयपीएलमध्येही क्रिस गेलनं सर्वाधिक शतकं झळकावली आहेत. आयपीएलमध्ये गेलनं आत्तापर्यंत ६ शतकं केली आहेत. या यादीमध्ये विराट दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराटनं आयपीएलमध्ये ४ शतकं केली आहेत. तरं एबी डिव्हिलियर्स, डेव्हिड वॉर्नरनं ३ आणि गिलख्रिस्ट, सेहवाग, मॅक्कलम, मुरली विजय, शेन वॉटसन आणि हशीम आमलानं आयपीएलमध्ये प्रत्येकी २ शतकं केली आहेत.


लिलावात गेलची विक्री नाही


आयपीएलच्या लिलावामध्ये पहिल्या वेळेला क्रिस गेलला कोणत्याही टीमनं विकत घेतलेलं नव्हतं. पण नंतर पंजाबचा सल्लागार आणि भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागनं गेलला विकत घ्यायचा आग्रह केला. त्यामुळे पंजाबनं गेलला विकत घेतलं.