गेलची धुवाधार खेळी आणि मैदानात पाऊस
सलग तीन सामन्यात त्याने असा काही खेळ केलाय ती संपूर्ण आयपीएलला करंट लागलाय.
नवी दिल्ली : आयपीएलमध्ये दिवसेंदिवस ख्रिस गेलच्या बॅटची जादू पाहायला मिळतेय सलग तीन सामन्यात त्याने असा काही खेळ केलाय ती संपूर्ण आयपीएलला करंट लागलाय. गेलच्या फॅन फॉलॉविंगमध्येही मोठी वाढ झालेय. पहिल्या २ मॅचमध्ये गेलला खेळवल गेल नव्हत. त्यानंतरच्या मॅचमध्ये त्याने आल्याआल्या अर्धशतक झळकावले तर दुसऱ्या मॅचमध्ये शतक झळकावले. आम्ही गेलला लवकर आऊट करु असे तिसऱ्या मॅचमध्ये खेळण्याआधीच कोलकाताच्या टीममधून सांगण्यात आले. कोलकाताचे बॉलिंग कोच हीथ स्ट्रीक यांच्याकडे त्याला आऊट करण्याचा प्लान असल्याचे सांगण्यात आले. पण दोन्ही टीम समोर आल्या तेव्हा सर्व प्लान वाहून गेले. केएल राहूल आणि गेलच्या तूफानी खेळीने कोलकाताला बॅकफूटवर आणलं.
गेलचा परफॉर्मन्स
गेलने २७ बॉलमध्ये ४९ रन्स केले पण त्यावेळीच मैदानात पाऊस आला. यावेळी राहुलने २३ बॉल्समध्ये ४६ रन्स केले. दोघांनी मिळून ५० बॉलमध्ये ९६ रन्सची भागीदारी केली. कोलकाताच्या संघाने पहिली बॅटींग करत १९२ रन्स बनविले तर पंजाबने ८.२ ओव्हरमध्ये ९६ रन्सचा टप्पा पूर्ण केला.
आयपीएलमध्ये २१६ रन्स करून गेल हा सर्वात जास्त रन करणारा फलंदाज ठरलाय. याआधी विराट कोहली सर्वात पुढे होता. ३ मॅचमध्ये त्याने १३४ बॉलमध्ये २१६ रन्स केले. यामध्ये १८ सिक्स आणि ११ फोर लगावले. १०७ च्या रनरेटने तो खेळत असून १६० हून अधिकचा त्याचा स्ट्राईक रेट आहे.