ख्रिस गेलनं `या` कारणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मानले आभार
जगभरात कोरोनाचं थैमान सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये ही लस खेळाडू आणि तिथल्या नागरिकांसाठी मोठी संजीवनी ठरणार आहे. त्यामुळे खेळाडूनं त्यांचे आभार मानले आहे.
जमॅका: वेस्ट इंडियन फलंदाज ख्रिस गेलने कॅरिबियन देशांमध्ये कोरोना लस पाठविल्याबद्दल भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. ख्रिस गेलने व्हिडीओ शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. त्यांच्या नियोजनाचं आणि त्यांनी केलेल्या मदतीचं कौतुक करत कृतज्ञता व्यक्त केला आहे.
'मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारत सरकार आणि सर्व लोकांचे मनापासून आभार मानतो. हे मोठे पाऊल उचलल्याबद्दल आम्ही सर्व जण त्याच्याप्रती कृतज्ञ आहोत. असं ख्रिस गेलनं या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
जगभरात कोरोनाचं थैमान सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये ही लस खेळाडू आणि तिथल्या नागरिकांसाठी मोठी संजीवनी ठरणार आहे. त्यामुळे खेळाडूनं त्यांचे आभार मानले आहे.
कोरोना विरुद्धच्या लढात भारताकडून अनेक देशांना मदत केली जात आहे. भारताकडून कॅरेबियान देशांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लस पोहोचवली आहे. ख्रिस गेलच्या आधी वेस्ट इंडीजचे माजी कर्णधार विव रिचर्ड्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केलं होतं.
विव रिचर्ड्स यांनी मोदींचं कौतुक केलं. भविष्यात दोन्ही देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध अधिक मजबूत होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आणि भारतीयांचे आभार मानले आहेत.