Video । अफलातून झेल, स्लिपमध्ये ख्रिस गेलची चतुराई
आतापर्यंत जॉंटी ऱ्होड्सच्या झेलची चर्चा होत होती. यापुढे वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलच्या झेलची होणार आहे. असा झेत आतापर्यंत कोणीही घेतलेला नाही.
टोरंटो : क्रिकेटमध्ये नवनवीन विक्रम होत असतात. तसेच अफलातून झेल घेतले जातात. आतापर्यंत जॉंटी ऱ्होड्सच्या झेलची चर्चा होत होती. यापुढे वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलच्या झेलची होणार आहे. असा झेत आतापर्यंत कोणीही घेतलेला नाही. गेल हा स्फोटक खेळीसाठी प्रसिद्ध आहे. आता तर त्याचे क्षेत्ररक्षण पाहिले तर फलंदाजांची झोप नक्कीच उडणार आहे.
वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल हा कॅनडामध्ये ग्लोबल टी-२० खेळत आहे. या लीगच्या वेनकूवर नाइट्स आणि वेस्टइंडीज बी यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात गेलने स्लिपमध्ये असा काही कॅच पकडला की सगळेच अवाक झाले. एकदम कठिण झेल त्यांने घेऊन धक्काच दिलाय.
फिरकी गोलंदाज फवादचा एक चेंडू हॉजच्या बॅटची कडा घेऊन स्लिपच्या दिशेने गेला. स्लिपमध्ये उभा असलेल्या गेलने डाव्या बाजूला डाईव्ह मारत तो पकडण्याचा प्रयत्न केला पण चेंडू त्याच्या हाताला लागून वर उडला, त्यावेळी गेल हवेतच होता त्याने त्याच्या उजव्या हाताने तो चेंडू पकडला.