मोहाली : ख्रिस गेल आपल्या स्फोटक खेळीसाठी ओळखला जातो. त्याचा मैदानावरील हटके अंदाज आपण याआधी अनेकदा पाहिला आहे. मैदानावरील गेलचा डान्स तु्म्ही पाहिला असेलच. परंतु 8 एप्रिलला हैदराबाद विरुद्धच्या सामन्याआधी गेलने भांगड्यावर ठेका धरला. हैदराबाद विरुद्ध मॅच खेळण्यासाठी  ८ एप्रिलला पंजाबची टीम आपल्या होम ग्राऊंडवर दाखल झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी ख्रिस गेल आणि पंजाबच्या टीमचा पांरपरिक अंदाजामध्ये मैदानाच्या बाहेर स्वागत करण्यात आलं. मैदानाबाहेर पोहचलेल्या बसमधून बाहेर पडताच टीमचे स्वागत करण्यासाठी काही वादक तिथे उपस्थित होते. ढोल वाजवून त्यांनी गेलचे स्वागत केले. तो परदेशी असल्याने त्याला मान दे्ण्यात आला. 


 



 


ढोल वाजवणाऱ्या वादकांना पाहून गेलदेखील उत्साही झाला. त्याने तेथेच ढोलच्या ठेका धरत भांगडा करायला सुरुवात केली. गेलला फ्कत थिरकण्यासाठी निमित्तच हवं असतं. विकेट घेतल्यानंतर, एखादी मॅच जिंकल्यानंतर गेल नेहमीच गंगनम स्टाईल मध्ये डान्स करतो. याआधी गेलने पंजाब टीमची मालकीण अभिनेत्री प्रीती झिंटा सोबत भांगडा केला होता.


गेल जरी आपल्या स्फोटक खेळीसाठी प्रसिद्ध असला, तरी त्याला या आयपीएलमध्ये विशेष काही करता आलेले नाही. त्याची बॅट अजूनही तळपलेली नाही. गेलने आतापर्यंत ५ मॅच मध्ये १४४ रन केल्या आहेत. आयपीएलमध्ये आतापर्यंत ३०० पेक्षा अधिक सिक्स मारणारा गेल हा एकमेव खेळाडू ठरला आहे.


पंजाबने सोमवारी झालेल्या मॅचमध्ये हैदराबादचा ६ विकेटने पराभव केला. पंजाबकडून केएल राहुलने ७१, तर मयंक अग्रवालने ५५ रनची खेळी केली. यो दोघांनी पंजाबच्या विजयाचा पाया रचला. या विजयामुळे पंजाब ८ गुणांसह अंकतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे.