Chris Woakes : याला म्हणतात दहशत! मैदानात येताच वोक्सचं हेलमेट तुटलं पण.., पाहा Video
England vs Netherlands : पुण्यात सुरू असलेल्या सामन्यात इंग्लंडच्या डावादरम्यान क्रिस वोक्सचं हेलमेट तुटलं. त्यावेळी टाईम आऊट (Time out Controversy) होऊ नये म्हणून वोक्सने (Chris Woakes) काय केलं पाहा...
Time out Controversy : वर्ल्ड कपमधील (World Cup 2023) दोन तळाच्या संघाचा सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडिअममध्ये (MCA) खेळवला जात आहे. गतविजेत्या इंग्लंडने नेदरलँडसमोर 339 धावांचं आव्हान दिलंय. बेन स्टोक्स (Ben Stokes) याची वादळी खेळी अन् ख्रिस वोक्स (Chris Woakes) याची अर्धशतकीय खेळीच्या जोरावर इंग्लंडने तगडं आव्हान दिलंय. या सामन्यात पुन्हा एक तोच प्रकार पहायला मिळाला, ज्यामुळे अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांचा सामना वादात (Time out Controversy) सापडला होता. मात्र, यावेळी शाकिब अल हसन नव्हता. मात्र, ख्रिस वोक्स याने रिक्स घेतली नाही. पाहा नेमकं काय झालं?
इंग्लंडच्या सहा विकेट्स गेल्यामुळे नेदरलँडचं पार जड होतं. त्यावेळी बेन स्टोक्स मैदानात पाय रोवून उभा होता. मोईन अली बाद झाल्यानंतर वोक्स मैदानात आला. मात्र, मैदानात आल्यानंतर आपण हेलमेट चुकीचं आणल्याचं त्याच्या लक्षात आलं. मॅथ्यूज सारखी सेम चूक केल्याने त्याला हसू देखील अनावर झालं. त्याने थेट अंपायरकडे धाव घेतली अन् हेलमेट तुटल्याचं सांगितलं आणि दुसरं हेलमेट आणण्याची परवानगी मागितली. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
'टाइम आउट' नियम आहे तरी काय?
40.1.1 नुसार, विकेट पडल्यानंतर किंवा फलंदाज निवृत्त झाल्यानंतर, नवीन फलंदाज 3 मिनिटांच्या आत पुढील चेंडू खेळण्यासाठी तयार असणे आवश्यक आहे. वर्ल्ड कपसाठी ही मर्यादा 2 मिनिटांची आहे. नवीन फलंदाज तसे करू शकला नाही तर त्याला बाद घोषित केले जाते. याला 'टाइम आउट' म्हणतात.
४०.१.२ नुसार, या निर्धारित वेळेत (३ मिनिटे) नवीन फलंदाज पूर्णतयारीने खेळपट्टीवर आला नाही, तर पंच नियम १६.३ (अंपायर्सद्वारे मॅचचा पुरस्कार) ची प्रक्रिया पाळतील. परिणामी, वरील नियमाप्रमाणेच फलंदाजाला 'टाइम आऊट' घोषित केले जाईल.
नेदरलँड्स प्लेईंग ईलेव्हन | स्कॉट एडवर्ड्स (कॅप्टन आणि विकेटकीपर), वेस्ली बॅरेसी, मॅक्स ओडोड, कॉलिन अकरमन, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, बास डी लीडे, तेजा निदामनुरु, लोगान व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त आणि पॉल व्हॅन मीकरेन.
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | जोस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, मोईन अली, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, गेस ऍटकिन्सन आणि आदिल रशीद.