Chris Woakes bowls off-spin : यजमान इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळला जात आहे. या मालिकेतील पहिले दोन्ही सामने इंग्लंड संघाने खिशात घातले आहेत. त्याचबरोबर तिसऱ्या सामन्यातही इंग्लंड वरचढ ठरताना दिसत आहे. अशातच या सामन्यात एक दुर्मिळ घटना पहायला मिळाली. इंग्लंडचा स्टार गोलंदाज ख्रिस वोक्स याने गोलंदाजी केली खरी पण वेगळ्याच अंदाजात... त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.


नेमकं काय झालं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडचा स्टार गोलंदाज ख्रिस वोक्स याने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात ऑफ-स्पीन गोलंदाजी केली. ख्रिस वोक्स हा फास्टर गोलंदाज आहे. त्याने भल्या भल्या क्रिकेटर्सला आपल्या पेसवर नाचवलंय. मात्र, आज चक्क त्याने फिरकी गोलंदाजी केली अन् सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. झालं असं की, श्रीलंकेच्या दुसऱ्या डावातील ओव्हर सुरू असताना अंपायर्सने खराब सुर्यप्रकाशामुळे फास्टर गोलंदाजाला ओव्हर टाकू देण्यास मनाई केली. अंपायर्सने इंग्लंडचा कॅप्टन ओली पॉपशी चर्चा केली. त्यानंतर ख्रिस वोक्स गोलंदाजीला आला पण फिरकीपटू म्हणून.. त्याचा व्हिडीओ इंग्लंड बोर्डाने शेअर केला आहे. 


पाहा VIDEO



सामन्यात आत्तापर्यंत काय झालं?


श्रीलंकेने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आव्हान स्विकारून इंग्लंडचा संघ फलंदाजीला आला. इंग्लंडकडून कॅप्टन ओली पोप याने सर्वाधिक 154 धावा चोपल्या. बेझबॉल शैलीत ओलीने फलंदाजी केली अन् संघाला तारलं. ओलीने 156 बॉलमध्ये 19 फोर अन् 2 सिक्स मारले. तर बेन डकेट याने 79 बॉलमध्ये 86 धावांनी आक्रमक सलामी दिली. त्यामुळे इंग्लंडचा संघ 325 धावांवर पोहोचला. त्याला उत्तर देताना श्रीलंकेची अवस्था बिकट झालीये. पाच विकेट गमावून श्रीलंकेने 130 धावा आत्तापर्यंत केल्या आहेत. निसांका वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला मैदानात पाय रोवता आला नाही.


श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : धनंजय डी सिल्वा (कॅप्टन), दिमुथ करुणारत्ने, पथुम निसांका, अँजेलो मॅथ्यूज, कुसल मेंडिस (विकेटकीपर), दिनेश चांदीमल, कामिंडु मेंडिस, असिथा फर्नांडो, लाहिरू कुमारा, मिलन रत्नायके आणि विश्वा फर्नांडो.


इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : ऑली पोप (कॅप्टन), डॅनियल लॉरेन्स, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, ऑली स्टोन, जोश हल आणि शोएब बशीर.