मुंबई: आंद्रे रसेलला नुकताच बॉल लागून दुखापत झाली. त्यानंतर फाफ ड्युप्लेसी सोबत अपघात झाला या घटना ताज्या असतानाच आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. सामना सुरू असताना एका खेळाडू अचानक खाली कोसळला. त्यामुळे सामना जवळपास दीड तास थांबवण्यात आला होता. त्यानंतर सामना पुन्हा सुरू झाला. या खेळाडूचं पुढे काय झालं. ही घटना नेमकी कुठे घडली या सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यूईएफए यूरो 2020 मध्ये डेनमार्क विरुद्ध फिनलँड सामना सुरू होता. या सामन्या दरम्यान क्रिस्टियन एरिक्सन या खेळाडू अचानक मैदानात कोसळला. त्यावेळी त्याच्या हृदयावर दबाव टाकून त्याला शुद्धीवर आणण्यात आलं. जवळपास 10 मिनिटं मैदानात या प्रकाराने गोंधळ उडाला होता. या खेळाडूला स्ट्रेचरवरून रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. 


 




29 वर्षांच्या एरिक्सन 43व्या मिनिटांला बाउंड्री लाइनजवळ कोसळल्यानं मोठा गोंधळ उडाला होता. यूईएफएने दिलेल्या माहितीनुसार त्याला 10 मिनिटांत स्ट्रेचरवरून रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाण्यात आलं. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून सर्वजण तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत.