Cristiano Ronaldo viral video : जागतिक स्तरावर फुटबॉलप्रेमींच्या मनाचा ठाव घेणारा आणि सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू म्हणजे क्रिस्तीयानो रोनाल्डो. पोर्तुगालच्या संघातून खेळणाऱ्या या खेळाडूनं विविध क्लब्समधून खेळत आपल्या खेळानं सर्वांच्याच मनावर छाप पाडली. आता पुन्हा एकदा रोनाल्डो चर्चेत आला आहे तो म्हणजे त्याच्या एका कृतीमुळं, स्पोर्ट्समन स्पिरीटमुळं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अल नासर क्लबमधून खेळणाऱ्या रोनाल्डोनं सोमवारी खेळवण्यात आलेल्या एका सामन्यात कमालीची खेळभावना दाखवली आणि पाहणारेही पाहतच राहिले. इराणच्या पर्सेपोलिस क्लबविरोधातील सामन्याच एशियन चॅम्पियन्स लीगमध्ये पार पडलेल्या सामन्यात रोनाल्डोला पेनल्टी देण्यात आली होती. पण, त्यानं मात्र ही पेनल्टी नाकारत पंचांच्याच निर्णयाला आव्हान दिलं. 


सामन्यादरम्यान काय घडलं? 


सामना सुरु झाल्यानंतर पूर्वार्धातच रोनाल्डो गोलपाशी असणाऱ्या बॉक्स मार्किंगमध्ये पडला. तेव्हाच रेफ्रीनं त्याला पेनल्टी दिली. पण, रोनाल्डोनं मात्र अतिशय प्रामाणिकपणे ही पेनल्टी नाकारली आणि नकळतच त्यानं विरोधी संघाची साध दिली. रोनाल्डोनं पेनल्टी नाकारताच मा निंग नावाच्या रेफ्कीनं फुटबॉल ग्राऊंडपाशी लावण्यात आलेल्या मॉनिटरवर याची पडताळणी केली आणि अखेर हा पेनल्टीचा निर्णय मागे घेतला. या क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगानं व्हायर झाला आणि सर्वांनी रोनाल्डोचं कौतुक केलं. 


हेसुद्धा वाचा : नव्या वर्षात कारप्रेमींना दणका; मारुती सुझुकी कंपनीचा मोठा निर्णय 


इतक्या मोठ्या खेळाडूकडून समोरच्या संघातील खेळाडूंप्रती दाखवण्यात आलेला हा आदर सर्वांचीच मनं जिंकून गेला. मुळात फुटबॉलसारख्या खेळात, जिथं पेनल्टीला प्रचंड महत्त्वं असतं अशा परिस्थितीमध्ये समोरच्या संघाची चूक नसतानाही आपल्याला मिळालेली पेनल्टी रोनाल्डोनं नाकारली आणि नव्या पिढीच्या खेळाडूंपुढे एक आदर्शच ठेवला. त्याची ही कृती सर्वांच्या नजरा वळवून गेली. 



अल नासर संघाकडून डिफेंडर अली लाजिमीला सामन्याच्या 17 व्या मिनिटालाच रेड कार्ड दाखवण्यात आलं होतं. ज्यामुळं संघ अवघ्या 10 खेळाडूंसह मैदानात होता. रोनाल्डोच्या या संघानं ई गटातून बादफेरीसाठी यापूर्वीच प्रवेश मिळवला आहे.