दुबई : महिलांच्या सामन्यात आपल्याला सर्रासपणे पुरष पंच पाहायला मिळतात. परंतु पुरुषांच्या मॅचमध्ये महिला पंच कधी पाहिली होती का ? अर्थात सध्याच्या घडीला या प्रश्नाचं उत्तर आहे हो. प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने उभं असणाऱ्या महिला आता या क्षेत्रातही दाखल झाल्या आहेत. आता पुरुषांच्या मॅचमध्ये देखील महिला पंच आपल्याला पाहायला मिळणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंच क्षेत्रावर असलेली पुरुषी मक्तेदारी अखेर मोडीत काढण्यात आली आहे. ही मक्तेदारी मोडित काढणाऱ्या महिला पंचाचे नाव क्लेयर पोलोसाक असं आहे. ही महिला पंच मूळची ऑस्ट्रेलियाची आहे. 


काही दिवसांपूर्वी नामिबिया आणि ओमान यांच्यामध्ये सामना खेळण्यात आला. या मॅचमध्ये महिलाने पंचाची भूमिका पार पाडली. या संदर्भातला व्हिडिओ आयसीसीने आपल्या अधिकृत ट्विटर अंकाऊंटवरुन शेअर केला आहे. 


 



 


क्लेयर पोलोसाक या ३१ वर्षाच्या आहेत. यांनी आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत १५ वनडे मध्ये पंचाची भूमिका पार पाडली आहे. या १५ मॅच महिला टीममध्ये खेळण्यात आल्या होत्या. आपल्या पंच म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात २०१६ साली केली होती. 


ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेला सामना हा क्लेयर पोलोसाक यांच्या कारकिर्दीतील पंच म्हणून पहिलाच सामना होता.