Suryakumar Yadav Meet Yogi Adityanath : टीम इंडियाचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा सोशल मीडियावर फोटो व्हायरल होत आहे. रविवारी झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यामध्ये भारताने 6 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात चौकार मारत विजयावर शिक्कामोर्तब करणारा सूर्यकुमार 'मॅन ऑफ द मॅच' चा मानकरी ठरला होता. सामना झाल्यावर दुसऱ्याच दिवशी सोमवारी सूर्याने योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोघांच्या भेटीचा सोशल मीडियावर जोरदार फोटो व्हायरल होत आहे. योगी आदित्यनाथ यांना त्यांच्या ट्विटरवर हा फोटो शेअर केला आहे. त्यासोबतच त्यांनी एक खास कॅप्शन दिलं आहे. लखनऊमधील निवासस्थानी यंग आणि एनेरजेटीक 360 डिग्री प्लेअर सूर्यकुमार यादवसोबत भेट. या भेटीची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे. 



मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कायम चर्चेत असतात. पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांच्यानंतर भाजपकडून योगींचं नाव चर्चेत आहे. सूर्याने सदिच्छा भेट घेतली की इतर कोणत्या कारणामुळे याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. फोटोमध्ये सूर्या योगींना पुष्पगुच्छ देत असल्याचं दिसत आहे.


सूर्यकुमार यादव आपल्या 360 बॅटींगने चर्चेत आला आहे. सूर्याने टी-20 क्रिकेटमध्ये छाप पाडली असून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सूर्याकडे संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबादारी सोपवण्यात आली आहे. भविष्यातील संघामधील प्रमुख खेळाडू म्हणून सूर्याकडे पाहिलं जातं.


दरम्यान, सूर्याने टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक कमी डावांमध्ये 1500 धावांचा टप्पा ओलांडला आहे. पहिल्या टी-20 मध्ये 47 धावा करत सूर्याने भारताकडून टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीमध्ये पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी आणि सुरेश रैना यांना मागे टाकत सूर्याने एकूण 1625 धावा केल्या आहेत.