टी-20 वर्ल्डकपनंतर विराट कोहली निवृत्त होणार?; जवळच्या व्यक्तीनं दिलं उत्तर
शोएब अख्तरने विराट कोहली वर्ल्डकपनंतर निवृत्त होऊ शकतो असं म्हटलं होतं
T20 World Cup : टी-20 विश्वचषक 2022 (T20 World Cup) सुरु झाला असून भारतीय संघ (Team India) 23 ऑक्टोबर रोजी सुपर 12 मध्ये पाकिस्तान विरुद्ध (Ind vs Pak) पहिला सामना खेळणार आहे. हा विश्वचषक सुरू होण्यापूर्वीच क्रिकेटच्या विश्वामध्ये अशा खेळाडूंच्या नावाची चर्चा सुरू झाली, ज्यांचा हा शेवटचा विश्वचषकही असू शकतो. या खेळाडूंच्या यादीत भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचेही (Virat Kohli) नाव घेतले जात होते. कोहली 5 नोव्हेंबरला 34 वर्षांचा होईल आणि तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याचा फॉर्म लक्षात घेऊन हा अंदाज लावला जात आहे. (Virat Kohli retire after T20 World Cup)
पण कोहलीचा (Virat Kohli) हा शेवटचा टी-20 विश्वचषक नसून तो दीर्घकाळ भारतासाठी खेळत राहणार आहे, असा विश्वास त्याचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा (rajkumar sharma) यांनी व्यक्त केला आहे. इंडिया न्यूजशी बोलताना विराट कोहलीचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा (rajkumar sharma) यांनी भाष्य केलं. 'मला हे स्पष्ट करायचे आहे की विराट कोहलीचा (Virat Kohli) हा शेवटचा टी-20 विश्वचषक नसेल. तो दीर्घकाळ भारतीय संघासाठी खेळत राहील. त्याचा फॉर्म, तंदुरुस्ती आणि धावा आणि सामने जिंकण्याची भूक यामुळे मला आशा आहे की तो पुढच्या टी-20 विश्वचषकातही दिसून येईल.
कोहलीने एक मोठा बॅड पॅच ओलांडला आहे आणि सर्वांना त्याची कामगिरी माहित आहे. तो आता चांगली कामगिरी करण्यास उत्सुक आहे. मला आशा आहे की भारताला हा टी-20 विश्वचषक जिंकायचा असेल तर तो महत्त्वाची भूमिका बजावेल, असेही राजकुमार शर्मा म्हणाले.
आशिया चषक 2022 च्या आधी विराट कोहली आपल्या कारकिर्दीतील सर्वात वाईट काळासोबत झुंज देत होता. मात्र या स्पर्धेत त्याने केवळ वेग पकडला नाही तर त्याच्या शतकाचा दुष्काळही संपवला. कोहलीने 1020 दिवसांनी अफगाणिस्तानविरुद्ध कारकिर्दीतील 71वे शतक झळकावले. ऑस्ट्रेलियातही तो आपला फॉर्म कायम ठेवेल, अशी अपेक्षा त्याचे चाहते वर्तवत आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर म्हणाला होता की कोहली सध्याच्या टी-20 विश्वानंतर निवृत्त होऊ शकतो, जेणेकरून तो इतर फॉरमॅटवर लक्ष केंद्रित करू शकेल. कोहलीने आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 71 शतके झळकावली आहेत. तो सचिन तेंडुलकरच्या 100 शतकांच्या मागे आहे.