कोब्रा Yoga करताना पाहिलंय? विश्वास बसत नसेल तर पाहा व्हिडीओ
कोब्रालाही कळलंय Yoga चं महत्त्व... पाहा आपली हेल्थ जपण्यासाठी कसा करतोय योगा...
मुंबई: सोशल मीडियावर पाळीव प्राणी व्यायाम करतात याचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता तर थक्क करणारा व्हिडीओ समोर आला आहे. तुम्ही आम्ही व्यायाम करायला कंटाळा करतो पण चक्क कोब्रानं योग करायला सुरुवात केली आहे. तुमची विश्वास बसत नसेल तर हा व्हिडीओ पाहाच.
व्यायम करायला आळस करणाऱ्यांनी हा व्हिडीओ नक्की पाहायला हवा. या व्हिडीओमध्ये कोब्रा योगा करत असल्याचं दिसत आहे. हा दावा झी 24 तासने नाही तर सोशल मीडियावर लोकांनीच केला आहे. कोब्राचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे.
कोब्रा या व्हिडीओमध्ये प्राणायाम करताना दिसत आहे. कोब्रा श्वास घेतो आणि सोडताना दिसत आहे. या कोब्राचा फुत्कार पाहून लोकही हैराण झाले. @megirish2001 या युझरने 37 सेकंदाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.
अनेक युजर्सनी याला प्राणायाम करणारा कोब्रा म्हटलं आहे. तर काहींनी तो योगा करत असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. दुसरा युजर म्हणतो त्याला फिट राहायचं म्हणून तो योगा करत आहे.