इस्तांबुल : भारताच्या महिला बॉक्सिंग खेळाडूंनी अहमद कोमर्ट इंटरनॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये नऊ पदकं मिळवले आहेत. रविवारी १७ सप्टेंबरला समारोप झालेल्या या टुर्नामेंटमध्ये भारतीय बॉक्सर सोनियाने सुवर्ण पदक मिळवले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनियाने कझाखस्थानच्या झाजिरा उराकाबेवा हिला ४८ किलोग्रॅम वर्गात ४-१ ने मात देत सुवर्ण पदक काबिज केले. 


यासोबतच परवीन, अंकुशिता बोरो, शशि चोप्रा, निहारिका गोनेला यांनी रजत पदक मिळवले. परवीनला फायनलमध्ये अनास्तासिया अरतामोनोवाकडून ५४ किलोग्रॅम वर्गात २-३ ने आणि शशिला फायनलमध्ये कझाखस्तानच्या व्लादिस्लावा कुख्ताकडून ५७ किलोग्रॅम वर्गात २-३ ने पराभवाचा सामना करावा लागला. 


अंकुशिताला ६० किलोग्रॅम वर्गाच्या फायनलमध्ये तुर्की काग्ला अलुक ने आणि निहारिकाला ७५ किलोग्रॅम वर्गात रशियाच्या शामोनोवा अनास्तासियाने मात दिली. भारतीय बॉक्सर ज्योती, तिलोतामा चानू, मनीषा आणि ललिताने ६४ किलोग्रॅम वर्गात कांस्य पदक मिळवले.