गोल्ड कोस्ट : ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्ट येथे सुरु असलेल्या २१व्या राष्ट्रकुल स्पर्धेतील सातव्या दिवशी भारताचासाठी चांगली बातमी आहे. नेमबाजीत ५० मीटर पिस्टोल प्रकारात भारताच्या ओम मिथरवालने भारताला कांस्यपदक मिळवून दिलेय. त्याने फायनलमध्ये २०.१.० इतके गुण मिळवले. मात्र भारताचा स्टार नेमबाज जीतू रायला ८वे स्थान मिळाले.  या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या डॅनियल रेपाचोलीने २२७.२ गुण मिळवत गोल्ड मेडल मिळवले. मिथरवालचे हे दुसरे पदक आहे. याआधी त्याने ९ एप्रिलला १० मीटर एअर पिस्टोल प्रकारातही कांस्यपदक मिळवले होते.


मेरी कोमचा फायनलमध्ये प्रवेश 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे बॉक्सिंगमध्ये मेरी कोमने भारतासाठी पदक निश्चित केलेय. ४५-४८ किलो वजनी गटात मेरी कोमने फायनलमध्ये प्रवेश केलाय. आता गोल्ड मेडल जिंकण्यापासून ती केवळ एक पाऊल दूर आहे. सेमीफायनलमध्ये मेरीच्या समोर श्रीलंकेच्या अनुषा दिलरुक्षीचे आव्हान होते. मात्र मेरीने तिला वरचढ होण्याची संधीच दिली नाही. तिने हा सामना ५-० असा जिंकला.


२२ पदकांसह तिसऱ्या स्थानावर


मंगळवारी भारताने केवळ दोन पदके जिंकली आणि येणाऱ्या दिवसांसाठी काही पदके निश्चित केली. आज भारताला नेमबाजी तसेच बॉक्सिंग, अॅथलेटिक्समध्ये पदकांची अपेक्षा आहे. पदक तालिकेत भारत २२ पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे.