नवी दिल्ली : वर्ल्ड चॅम्पियन वेटलिफ्टर मीराबाई चानू (४८ कि.ग्रॅ.) ने रेकॉर्डतोड प्रदर्शन केलं आहे. तिच्या बहारदार खेळीमुळे २१ व्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला पहिलं गोल्ड मेडल मिळालं आहे. तिनही प्रयत्नात तिने आपल्यापेक्षा डबल ८० किलो, ८४ किलो आणि ८६ किलो वजन उचलले. यानंतर क्लीन अॅंड जर्कमध्येही आपल्या शरीराच्या दुप्पट वजन उचलले. ३ यशस्वी प्रयत्नात अनुक्रमे १०३ किलो, १०७ किलो आणि ११० किलो वजन उचलून ओव्हरऑल रेकॉर्ड आपल्यानावे केला. चानूने ग्लास्गोमध्ये झालेल्या गेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये सिल्व्हर मेडल जिंकल होतं. तेव्हा तिने एकूण १९६ किलो (८६ आणि ११० किलो) वजन उचलले होते.


वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य


दरम्यान भारताचा पी. गुरुराजा यांने वेटलिफ्टिंगमध्ये हे रौप्य पदक मिळवलेय.पी. गुरुराजा यांने ५६ किलो वजनी गटात रौप्य पदकाची कमाई केली आहे. २८ वर्षीय गुरुराजा यांने २४९ किलो वजन उचलत भारताच्या खात्यात पहिले पदक जमा केले आहे.मलेशियाच्या मुहम्मद अझहर अहमद यांने २६१ किलो वजन उचलत सुवर्ण पदक पटकावले तर श्रीलंकेच्या अशून चतुरंगा लकमल यांने २४८ किलो वजन उचलत कांस्य पदकाची कमाई केली.