गोल्ड कोस्ट : राष्ट्रकुल स्पर्धेत आज दहाव्या दिवशी बॉक्सिंगमध्ये भारताच्या मेरी कोमने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. ४८ किलो वजनीगटात ३५ वर्षीय मेरी कोमने पदकाला गवसणी घातली आहे. पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियन असणाऱ्या मेरी कोमकडे राष्ट्रकुल स्पर्धेचे एकही पदक नव्हते. पण आज मेरी कोमने सुवर्णपदक तिच्या नावे केले आहे आणि भारताच्या खात्यात सुवर्ण पदक टाकले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेरी कोम व क्रिस्टिना ओहारा या दोघींमध्ये अंतिम व निर्णायक सामन्यात एकूण पाच फेऱ्या झाल्यात. मेरी कोमने प्रत्येक फेरीत वर्चस्व कायम राखलं आणि भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. मेरी कोमने अंतिम फेरीत उत्तर आयर्लंडच्या क्रिस्टिना ओहारावर ५-० ने मात करत आपल्या नावावर सुवर्ण पदक केले.  



राष्ट्रकुलमधील मेरी कोमचे पहिले पदक आहे. मेरी कोमच्या या गोल्डन पंच  कामगिरीमुळे भारताच्या खात्यात एकूण १८ सुवर्णपदके जमा झाली आहेत. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने एकूण ४३ पदकं जिंकली आहेत. त्यामुळे १८ सुवर्णपदकं, ११ रौप्यपदकं व १४  कास्यपदकांचा समावेश आहे.