मुंबई : Men’s Hockey संघाने ऑलिम्पिकमध्ये भारताने अखेर ब्राँझ मेडलची कमाई केली आहे. भारतीय हॉकी संघाने जर्मनीचा अटीतटीच्या सामन्यात पराभव केला. भारतीय हॉकी संघाला 41 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याची संधी मिळाली आहे. यानंतर भारतीय पुरुष हॉकी संघाचं सर्व स्तरावरून कौतुक होतं. तर चक दे इंडिया सिनेमातील कोच कबीर खान अर्थात अभिनेता शाहरूख खानने देखील टीमचं अभिनंदन केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यासंदर्भात शाहरूख खाने ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये शाहरूख म्हणतो, "WOW, भारतीय पुरुष हॉकी टीमचं अभिनंदन. हा खूपच उत्कंठावर्धक सामना होता. लवचिकता आणि कौशल्याच्या जोरावर शिखर गाठलंच."  


इतकंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील हॉकी टीमचं कौतुक केलं आहे. ते म्हणाले, "ऐतिहासिक! असा दिवस जो प्रत्येक भारतीयाच्या लक्षात राहणार आहे. कांस्य पदक जिंकल्याबद्दल आमच्या पुरुष हॉकी संघाचं खूप अभिनंदन. या पराक्रमाने त्यांनी संपूर्ण राष्ट्राची, खासकरून आपल्या तरुणांच्या कल्पनाशक्तीवर विजय मिळवलाय. भारताला आमच्या हॉकी संघाचा अभिमान आहे,"


तब्बल 41 वर्षांनंतर ऑलिम्पिक (Olympics) सुवर्णपदक जिंकण्याचे भारतीय पुरुष हॉकी संघाचे स्वप्न मंगळवारी झालेल्या उपांत्य लढतीत विश्वविजेत्या बेल्जियमकडून 2-5 अशा फरकाने पराभवामुळे भंगले  होते. परंतु आज भारताला जर्मनीविरुद्धची लढत जिंकून कांस्य पदक जिंकण्याची आशा होती. भारत आणि जर्मनीमध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिक इतिहासात आठ सुवर्णपदके जिंकण्याची किमया साधली आहे. यापैकी अखेरचे सुवर्णपदक मॉस्को ऑलिम्पिकमध्ये 1980 मध्ये मिळवले होते.



भारताने तिसऱ्या क्वार्टरमध्ये सामन्यात वर्चस्व मिळवले. भारतीय खेळाडूंनी आक्रमक खेळी दाखवत पाचवा गोल केला. भारताने आणखी गोल करत 5-3  आघाडी घेतली. त्याआधी रुपिंदर पालने पेनल्टी स्ट्रोक मारत भारताला चौथा गोल करुन दिला. भारताने सामन्यात 4-3 ने आघाडी घेतली.   


भारताने जर्मनीला रोखले 


मात्र भारताने पुनरागम करत दुसरा गोल केला. हार्दिक सिंह याने केलेल्या गोलमुळे भारताला दिलासा मिळाला. यानंतर भारताने हाफ टाइमच्या आधी अजून एक गोल करत 3-3 ने बरोबरी केली. तर दुसऱ्या क्वार्टरपर्यंत जर्मनीने 2-1 आघाडी घेतली होती. यानंतर सलग अजून एक गोल करत जर्मनीने 3-1 ने भारताला पिछाडीवर टाकले.  दरम्यान, भारताने पहिल्या 15 मिनिटांमध्ये स्कोअर 0-1 होता. यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये सिमरनजीतने गोल करत बरोबरी केली.