नवी दिल्ली :  टीम इंडियाचे मुख्य कोच रवि शास्त्री यांचा जलवा अजूनही कायम आहे. आपल्या क्रिकेटिंग करिअरमध्ये शास्त्री यांनी अनेक विक्रम बनविले, तसे त्यांच्या फॅन्सची संख्याही वाढली. 
 
 रवि शास्त्री यांच्या फॅन्सच्या लिस्टमध्ये सामान्य व्यक्तींच नाही तर चित्रपट जगतातील दिग्गजांही समावेश होता. 
 
 अभिनेत्री आणि सध्याच्या काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या अभिनेत्री खुशबू सुंदरही रवि शास्त्री यांची जबरदस्त फॅन आहे.



खुशबू यांचे स्वप्न नुकतेच पूर्ण झाले. खुशबू यांनी टीम इंडियाचे हेड कोच रवि शास्त्री यांच्यासोबत सेल्फी घेऊन रवि शास्त्रींना भेटण्याची ३३ वर्षांची इच्छा पूर्ण केली. 
 
 खुशबू यांनी आपली हिंदी चित्रपटातील कारकीर्द बाल कलाकार म्हणून सुरू केली होती. तिचा पहिला चित्रपट ‘द बर्निंग ट्रेन ' आहे, हा चित्रपट १९८० मध्ये आला होता. त्यानंतर तिने नसीब, लावारिस, कालिया आणि दर्द का रिश्ता हे चित्रपट केले. 
 
 रवि शास्त्री यांना भेटल्यानंतर खुशबू यांनी ट्विट केले त्यात म्हटले की, माझे स्वप्न पूर्ण झाले.  शेवटी माझा हिरो मला भेटला.  माझे धैर्य कामाला आले. त्यांना भेटण्यासाठी ३३ वर्ष वाट पाहिली.