नवी दिल्ली: टायपींग करताना केवळ आळसापोटी वापरलेला 'कॉपी पेस्ट' शॉर्टकट भारतीय क्रिकेट बोर्डाला (बीसीसीआय) चांगलाच महगात पडला आहे. 'कॉपी पेस्ट' ऑप्शनचा वापर करताना बीसीसआयने राज्य संघांना पाटवलेल्या पत्रात नजरचूकीने भलताच मजकूर टाकला. त्यामुळे संदेश समजून घेताना अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. परिणामी बीसीसीआयवर नामुश्की ओढावली.


'कॉपी पेस्ट' शार्टकटमुळे बीसीसीआयची फजीती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'कॉपी पेस्ट' शार्टकटमुळे बीसीसीआयची फजीती तर तेव्हा झाली, बीसीसीआयने जेव्हा राज्य संघांना पाठवलेल्या पत्रात २०१७-१८ ऐवजी २०१६-१७ लिहिण्यात आले. बीसीसीआयचे कार्यकारी सचीव अमिताभ चौधरी यांनी राज्य संघांना २८ फेब्रुवारीला मुंबईत होणाऱ्या कर्णधारांच्या प्रशिक्षकांच्या वार्षीक बैठकीसंदर्भात एक पत्र पाठवले होते. या पत्रात २०१७-१८ ऐवजी २०१६-१७ लिहिण्यात आले. 


ही एक टायफोग्राफीक चूक


या पत्रात लिहीण्यात आले होते की, या बैठकीत चा उद्देश हा कर्णधार आणि प्रशिक्षकांकडून २०१६-१७मध्ये पार पडलेल्या रणजी ट्रॉफीबद्धल प्रतिक्रीया घेणे चर्चा करणे हा होता. अर्थात, प्रशासनाकडून पत्राचा मजकूर टाईप करताना झालेली ही एक टायफोग्राफीक चूक होती. मात्र, अनेक संघांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे की, बीसीसीआयला झालेल्या चुकीची कल्पना मिळूनही त्यांनी त्यात बदल केला नाही.