मुंबई : कोरोना व्हायरस साथीच्या काळात क्रीडा विश्वावर मोठं संकट आलं आहे. इंग्लंड क्रिकेट संघाने त्यांच्या पगारात 15 टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) एका निवेदनात ही माहिती दिली. नियामक मंडळाने सांगितले की, ईसीबीशी करार केलेल्या खेळाडूंना 'रिटेनर, मॅच फी आणि विन बोनस' मध्ये एक वर्ष वेतन कपात करुन मिळणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्टुअर्ट ब्रॉड आणि ख्रिस वॉक्स यांनी अलीकडेच सांगितले की, खेळाडूंनी वेतनात कपात करण्यास सहमती दर्शविली. जेव्हापासून कोरोना विषाणूचा संसर्ग वाढला तेव्हापासून इंग्लंड क्रिकेट आर्थिक संकटात सापडले आहे.


या निवेदनात म्हटले आहे की, कोविड-19 मुळे ईसीबीच्या महसुलात मोठी घट झाली आहे. त्यामुळे खेळाडूंच्या वेतनात एक ऑक्टोबरपासून कपात होणार आहे.' 


इंग्लंडने वेस्टइंडीज, पाकिस्तान, आयरलँड आणि आस्ट्रेलिया यांच्यासोबत खेळलेल्या सामन्यात मैदानात एकही प्रेक्षक उपस्थित नव्हता.