Corona : या माजी पाकिस्तानी क्रिकेटरचं सरकारकडे भारताला मदतीचं आवाहन
भारताला मदत करण्याचं या माजी पाकिस्तानी क्रिकेटरचं आवाहन
मुंबई : भारतातील कोरोनाच्या नवीन लाटेने यावेळी भयानक परिस्थिती निर्माण केली आहे. दररोज लाखो लोकांना कोरोनाची लागण होत आहे. ऑक्सिजन अभावी लोकं मरत आहेत. रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता आहे, त्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. यातच पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर या अशा कठीण परिस्थितीत भारताच्या मदतीसाठी पुढे आला आहे. त्याने पाकिस्तान सरकारला या कठीण काळात भारताला मदत करण्याची विनंती केली आहे.
माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तो भारतातील कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर बोलत होता. यात त्याने आपल्या सरकारला भारतात ऑक्सिजनची कमतरता भागवण्यासाठी मदतीचे आवाहन केले. त्याने भारतीय जनतेला पाठिंबा दर्शविला.
अख्तर म्हणाला की, "हिंदुस्थान सध्या खूप कठीण परिस्थितीतून जात आहे. चार लाख प्रकरणे येत आहेत, महाराष्ट्रात येत आहेत, मुंबई येत आहेत, दिल्लीत येत आहेत. अशा कोणत्याही सरकारसाठी परिस्थितीला सामोरे जाणे फार कठीण आहे. मी मनापासून आवाहन करतो. मी माझ्या सरकारलाही आवाहन करतो, मी माझ्या लोकांना आव्हान करतो की, सध्या भारताला भरपूर ऑक्सिजन टँक आवश्यक आहेत."
तो पुढे म्हणाला की, "ऑक्सिजन टाक्या कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे ऑक्सिजन टाक्या आवश्यक आहेत. त्या सर्व लोकांना जे आपले भावंड, वृद्ध आहेत त्यांना मदतीची आवश्यकता आहे."