IPL 2022 : बीसीसीआय आयपीएल 2022 च्या तयारीत व्यस्त आहे. नवीन हंगामापूर्वी मेगा लिलाव होणार आहे. यावेळी टी-20 लीगमध्ये 8 ऐवजी 10 संघ उतरणार असल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये ही उत्सूकता आहे. मात्र यादरम्यान लीगबाबत मोठी बातमी येत आहे. कोरोनामुळे, मेगा लिलावाची तारीख आणि ठिकाण दोन्हीमध्ये बदल होऊ शकतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीही नुकतेच पॉझिटिव्ह आढळले होते. यापूर्वी 8 जुन्या संघांनी 27 खेळाडूंना कायम ठेवल्याची माहिती आहे. 2 नवीन संघ आता त्यांच्यासोबत 3-3 खेळाडू जोडू शकतील.


इनसाइड स्पोर्ट्सच्या बातमीनुसार, 12 आणि 13 फेब्रुवारीला बंगळुरूमध्ये मेगा लिलाव होणार आहे. परंतु कोविड-19 च्या निर्बंधांमुळे त्यात बदल होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, 'काही गोष्टी आमच्या हातात नसतात. आपण वाट पाहावी. निर्बंधांबाबत माहिती घेतली जात आहे. आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. स्थळ बदलण्याची गरज भासल्यास ते अल्पसूचनेवर केले जाईल.


बंगळुरू व्यतिरिक्त, बीसीसीआयने मेगा लिलावासाठी कोची, कोलकाता आणि मुंबई ही पर्यायी ठिकाणे म्हणून ठेवली होती. मात्र तिन्ही शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अशा स्थितीत मंडळाला नवीन जागा शोधावी लागली तर तारीखही बदलावी लागणार आहे. लिलावाबाबत मंडळ इतर राज्य संघटनांशीही बोलत आहे, जेणेकरून शेवटच्या क्षणी बदल करण्याची तयारी करता येईल.


माहितीनुसार, बीसीसीआयने सर्व राज्य संघटनांना 17 जानेवारीपर्यंत लिलावासाठी खेळाडूंची नावे पाठवण्यास सांगितले आहे. सुमारे 1000 खेळाडूंची नावे येण्याची शक्यता आहे. बोर्डाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, सर्व राज्य संघटनांना 17 जानेवारीपर्यंत नावे पाठवण्यास सांगण्यात आले आहे. मात्र यातून केवळ 250 खेळाडूंनाच शॉर्टलिस्ट केले जाणार आहे. कोरोनामुळे IPL 2020 चे सामने UAE मध्ये आयोजित करण्यात आले होते. आयपीएल 2021 च्या दुस-या टप्प्यातील सामनेही तिथे खेळले गेले होते.