लंडन : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या बघता बहुतेक देशांकडे याचा सामना करण्यासाठी रुग्णालयंदेखील कमी पडत आहेत. कोरोनाग्रस्तांवर उपचार व्हावेत म्हणून इंग्लंडच्या वार्विकशायर काऊंटी क्रिकेट क्लबने त्यांचं एजबॅस्टन स्टेडियम सरकारला द्यायचा निर्णय घेतला आहे. कोरोना व्हायरसची चाचणी करण्यासाठी या स्टेडियमचा केंद्र म्हणून वापर करण्यात येणार आहे.




ज्यांना कोरोना व्हायरसची टेस्ट करायची आहे, त्यांनी या स्टेडियममध्ये यावं, असं आवाहन काऊंटी क्लबने केलं आहे. काऊंटी क्रिकेटच्या मॅच, बैठका २९ मेपर्यंत होणार नाहीत. आमचे कर्मचारी या कठीण काळामध्ये समाजाची मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. इथलं कोरोना व्हायरस टेस्ट सेंटर काहीच दिवसात सुरू होईल, असं क्लबने सांगितलं.