कोरोनाचे सावट : आयसीसी पुरूष क्रिकेट वर्ल्ड कप लीग- २ मालिका पुढे ढकलली
कोरोनाचे सावट : आयसीसी पुरूष क्रिकेट वर्ल्ड कप लीग- २ मालिका पुढे ढकलली
मुंबई : जगात कोरोना व्हायरसचे सावट असल्याने खबरदारी घेण्यात येत आहे. आता आयसीसी पुरूष क्रिकेट वर्ल्ड कप लीग- २ मालिका पुढे ढकलण्यात आली आहे. ही मालिका अमेरिकेतील फ्लोरिडा येथे १ एप्रिलपासून होणार होती. दरम्यान, आयपीएलचे सामने १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहेत. कोरोना व्हायरसच्या धसक्यामुळे खबरदारीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) International Cricket Council (ICC) शुक्रवारी जाहीर केले की, अमेरिकेतील फ्लोरिडा येथे १ एप्रिलपासून आयसीसी पुरूष क्रिकेट वर्ल्ड कप लीग-२ ची सहावी मालिका होणार होती. ही क्रिकेट लीगची मालिका कोरोनाव्हायरसच्या उद्रेकामुळे पुढे ढकलण्यात आली आहे.
सहा एकदिवसीय सामने (एकदिवसीय) १ ते ८ एप्रिल दरम्यान फोर्ट लॉडरडेल येथील ब्रॉवर्ड काउंटी स्टेडियमवर होणार होते. ही मालिका युनायटेड स्टेट्स, स्कॉटलंड आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात होणार होती.
करोना सावटामुळे आयपीएलची स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आधीच्या वेळापत्रकाप्रमाणे आयपीएल २९ मार्च रोजी सुरू होणार होती. परंतु आता ती १५ एप्रिल रोजी सुरु होईल, असे बीसीसीआयने सांगितले आहे. जगभरातील ११० पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचा प्रसार झाला आहे. भारतामध्येही ८० जणांना लागण झाल्याचे आढळले आहे.