IPL 2020 : RCB च्या खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याचा संशय
कोरोनाने खेळाडूंना आपल्या जाळ्यात ओढलं
मुंबई : जगभरात अल्पावधीतच पसरत चाललेल्या कोराना व्हायरस आता क्रिकेटपर्यंतही पोहोचला आहे. कोरोना व्हायरसमुळे अनेक ठिकाणचे क्रिकेट सामने हे रद्द करण्यात आले आहेत. एवढंच नव्हे तर लोकप्रिय असलेल्या आयपीएलवर देखील कोरोनाचं सावट होतं. असं असताना एका खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या खेळाडूला सध्या संघापासून वेगळं ठेवण्यात आलं आहे.
आयपीएलसंबंधित महत्वाचा निर्णय हा बीसीसीआयकडून 14 मार्च म्हणजे शनिवारी घेण्यात येणार असताना एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केन रिचर्डसनला कोरोनाची लागण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
कोरोनाने क्रिकेटर्सना देखील आपल्या जाळ्यात ओढून घेतलं आहे. रिचर्डसन न्यूझीलंड विरूद्ध सामन्यात आता खेळू शकणार नाही. रिसर्डसन यावर्षी आयपीएलच्या रॉयल चॅलेंजेस ऑफ बंगलुरूमधून खेळत आहे.
रिपोर्टनुसार साऊथ आफ्रिकेच्या दौऱ्यानंतर केन रिचर्डसनची तब्बेत बिघडली. घशाला त्रास जाणवू लागला. यानंतर त्याला न्यूझीलंडच्या एका सामन्यातून बाहेर करण्यात आलं. सध्या रिचर्डसनला खेळाडूंपासून लांब ठेवण्यात आलं आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचं म्हणणं आहे की,'आमचा मेडिकल स्टाफ त्याच्यावर उपचार करत आहेत.'(भारतात कोरोनाची लागण झालेला पहिला रूग्ण एकदम ठणठणीत)
करोनाची लागण झाल्यामुळे केन आगामी ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला मुकणार आहे. त्याशिवाय आयपीएललाही तो मुकण्याची शक्याता वर्तवण्यात येत आहे. २९ मार्चपासून आयपीएल स्पर्धेला सुरूवात होणार आहे. केन रिचर्डसनला आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या आरसीबी संघाकडून खेळतोय. चांगला गोलंदाज संघापासून दूर गेल्यास विराट कोहलीला चांगलाच फटका बसणार आहे.