नवी दिल्ली : भारतीय महिला टेनिसपटू सानिया मिर्झाने (Sania Mirza) कोरोना वायरसच्या (Coronavirus) या संकटात मदतीसाठी हात पुढे केला आहे. रोजंदारीवर असणाऱ्या मजूरांसाठी जेवणासह इतर काही जीवनावश्यक गोष्टी पुरवण्यासाठी ती पुढे सरसावली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश पुढील 21 दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे दैनंदिन रोजंदारीवर असणाऱ्या मजूरांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. आपल्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी त्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनियाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या कठीण काळात मजुरांना मदत करण्याचं तिने आवाहन केलं आहे. या लॉकडाऊनमध्ये रोजंदारीवर असणाऱ्यांना अधिक फटका बसतो आहे. त्यांना काम नसल्याने त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न आहे. अशा मजूरांसाठी आपण एकत्र पुढे येऊन त्यांना मदत करण्याचं आवहन तिने केलं आहे. या काळात एकत्र येऊन या कुटुंबाना मदत करण्याचं तिने सांगितलंय.



कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देश 21 दिवसांसाठी लॉकडाऊन करत असल्याची घोषणा केली. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी हे पाऊल उचलणं अतिशय महत्त्वाचं असल्याचं मोदींनी सांगितलं. या लॉकडाऊनमध्ये गरीब मजूरांसाठी मोठी समस्या निर्माण झाली आहे. अनेक मोठ्या व्यक्तींनी अशा लोकांची मदत करण्याचं आवाहन केलं आहे.


दरम्यान, कोरोना व्हायरसचा माणसांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे. हा व्हायरस संक्रमित होऊ नये म्हणून घराबाहेर न पडण्यातच सरकारकडून आवाहन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मजदुरी करणाऱ्या कामगारांसाठी दिल्ली सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या बांधकाम मजूरांना पाच-पाच हजार देण्याची घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.