टोकीओ : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. जगभरात कोरोनाव्हायरसच्या  (Coronavirus) उद्रेकानंतर अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात येत आहेत. कोरोनाचे सावट क्रीडा स्पर्धांवर दिसून येत आहेत. जगातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा, टोकीओ ऑलिम्पिक.(Tokyo Olympics ) आता ही स्पर्धा होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. ही स्पर्धा थेट पुढील वर्षी अर्थात २०२१ला होणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) सदस्याने असा दावा केला आहे की या वर्षाच्या मध्यभागी होणारी ऑलिम्पिक स्पर्धा एक वर्षासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारीच आयओसीने म्हटले होते की, ऑलिम्पिक स्पर्धेबाबत निर्णय चार आठवड्यांत घेण्यात येईल. यापूर्वी सोमवारी कॅनडाने स्पष्ट केले होते की, जर जुलैमध्ये ऑलिम्पिक खेळ होत असतील तर त्यांचा संघ त्यात भाग घेणार नाही. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाने आपल्या खेळाडूंना ऑलिम्पिक २०२१ साठी तयारी करण्यास सांगितले होते. कारण अशा परिस्थितीत ऑलिम्पिक खेळ पुढे ढकलणे जवळजवळ निश्चित आहे.



यावर्षी २४ जुलैपासून जपानची राजधानी टोकियो येथे ऑलिम्पिक आणि पॅरालंपिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या कारणास्तव, २०२० ला देखील म्हटले जात होते. पण आता कोविड -१९ विषाणूचे ढग या खेळावर फिरू लागले आहेत. कॅनेडियन ऑलिम्पिक आणि पॅरालंपिक समितीने ऑलिम्पिक आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या आयोजकांना टोकियो खेळ आणखी एक वर्ष वाढवण्यास सांगितले होते.


कोरोनाचा फटका क्रीडा क्षेत्रालाही बसला असून सर्व क्रीडा स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. २४ जुलै २०२० पासून रंगणारी प्रतिष्ठेची टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धादेखील पुढे ढकलण्याचे संकेत देण्यात आले आहेत. ही स्पर्धा २०२० ऐवजी २०२१ या वर्षात आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे सदस्य डिक पौंड यांनी दिली.


यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद जपानकडे आहे. २४ जुलै ते ९ ऑगस्ट या दरम्यान ही ऑलिम्पिक स्पर्धा नियोजित आहे. कोरोनाच्या संकटामुळे स्पर्धेचे आयोजन पुढे ढकलावे अशी मागणी विविध स्तरातून केली जात होती. पण स्पर्धा नियोजित वेळीच होणार असा पवित्रा जपानचे सरकार आणि ऑलिम्पिक समिती यांच्याकडून घेण्यात आला. त्यानंतर आधी कॅनडा, नंतर ऑस्ट्रेलिया आणि आता इंग्लंडने आपले खेळाडू या स्पर्धेसाठी पाठवण्यास नकार दिला. त्यामुळे या तिहेरी दणक्यानंतर जपानचे सरकारने नमसते घेतले.