मुंबई : थ्रिलर आणि सस्पेन्स कथा लोकांच्या मनाला खूप आकर्षित करतात. यामुळेच हॉलिवूडपासून ते बॉलीवूडपर्यंतचे चित्रपट निर्माते अशा रोमांचित कथा सादर करण्याचा प्रयत्न करतात. आज आम्ही तुम्हाला अशीच एक क्रिकेटसंदर्भातील कहाणी सांगणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका अनामिक क्रिकेटरची खरी कहाणी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, जी ऐकल्यानंतर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल.


कोटा रामास्वामी (Cotah Ramaswami) नावाच्या खेळाडूची ही कहाणी आहे. जो एक दिवस घरातून बाहेर पडला आणि अजून परत आलाच नाही. काही वर्षे गेली आणि क्रिकेट विस्डेनच्या बायबलने खेळाडू मृत झाल्याचं गृहीत धरलं. पण, चाहत्यांना ही गोष्ट अजिबात आवडली नाही, यानंतर रामास्वामींना मृत मानण्यास विस्डेनला नकार द्यावा लागला. मात्र, आता 'विस्डेन'नंही त्यांना 'मृत' घोषित केलंय.


रामास्वामी यांचा मृतदेह सापडलेला नाही


आजपर्यंत कोटा रामास्वामी यांचा मृतदेह सापडलेला नाही. कुठे गेला हा खेळाडू? आजतागायत याबद्दल काहीच माहिती मिळालेली नाही. 


मिळालेल्या माहितीनुसार, 1985 मध्ये ते सकाळी-सकाळी त्यांच्या घरून कोणालाही काहीही न सांगता बाहेर गेले. ज्यानंतर आजपर्यंत ते परतले नाहीयेत. वयाच्या 89 व्या वर्षी ते घरातून बेपत्ता झाले होते.



कोटा रामास्वामी यांचा जन्म 16 जून 1896 रोजी मद्रासमध्ये झाला. कोटर रामास्वामी यांचे वडील बुची बाबू नायडू होते आणि त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी क्रिकेटची होती. ते सुरुवातीला मद्राससाठी वेगवेगळ्या स्तरावर क्रिकेट खेळले होते.


इंग्लंडविरुद्ध केलं होतं पदार्पण


कोटर रामास्वामी यांना 1936 च्या भारताच्या इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियात स्थान मिळालं होतं. पदार्पणाच्या वेळी कोटर रामास्वामी 40 वर्षींचे होतं.


रामास्वामी यांच्या मृत्यूचं गूढ अद्याप कायम


दक्षिण भारतीय क्रिकेटचे जनक म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोटा रामास्वामी यांचा मृत्यूचं गूढ आजंही कायम आहे. ते 15 ऑक्टोबर 1985 रोजी वयाच्या 89 व्या वर्षी मद्रासमधील अडयारमधील घरातून अचानक बेपत्ता झाले. त्यानंतर ते दिसले नाहीत. आजपर्यंत त्याचा मृतदेह सापडला नाही.