कॅप्टन होताच खेळाडूचा धमाका, एका ओव्हरमध्ये केल्या 34 धावा
जोरदार कामगिरी केली आहे. या फलंदाजाने एका ओव्हरमध्ये 5 सिक्स आणि 1 फोर ठोकत एकूण 34 धावा केल्या.
मुंबई : क्रिकेटमध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. सध्या आयपीएलचा 15 वा मोसम सुरु आहे. या मोसमादरम्यान फलंदाजाने कॅप्टन होताच जोरदार कामगिरी केली आहे. या फलंदाजाने एका ओव्हरमध्ये 5 सिक्स आणि 1 फोर ठोकत एकूण 34 धावा केल्या. इतकंच नाही, तर या फलंदाजाने एकूण खेळीत तब्बल 17 खणखणीत सिक्स लगावले. (county championship ben stoke hits 34 runs an over with 5 sixes and 1 four)
इंग्लंडचा ऑलराऊंडर बेन स्टोक्सला जो रुटने कॅप्टन्सी सोडल्यानंतर नवी जबाबदारी देण्यात आली. यानंतर बेन स्टोक्सचा हा आक्रमक रुप पाहायला मिळाला.
बेन स्टोक्सने काउंटी चॅम्पियनशीप डिव्हीजन 2 स्पर्धेत डरहमकडून खेळताना वॉस्टशायर विरुद्ध हा कारनामा केला. स्टोक्सने 64 बॉलमध्ये खणखणीत शतक पूर्ण केलं.
या दरम्यान स्टोक्सने एकाच ओव्हरमध्ये 34 धावा करण्याचा कारनामा केला. स्टोक्सने स्पिनर जोश बेकरच्या गोलंदाजीवर एकाच ओव्हरमध्ये 34 रन कुटल्या.
स्टोक्सने या ओव्हरमधील पहिल्या 5 बॉलमध्ये 5 सिक्स मारले. त्यानंतर 6 व्या बॉलवर स्टोक्सने खणखणीच फटका मारला. मात्र दुर्देवाने तो बॉल बाऊंड्री लाईनच्या आत पडला. त्यामुळे थोडक्यात एका ओव्हरमध्ये 6 सिक्स मारण्याचा विक्रम हुकला.
हा सर्व थरार सामन्यातील 117 व्या ओव्हरमध्ये घडला. तेव्हा स्टोक्स 59 बॉलमध्ये 70 धावांवर खेळत होता. त्यानंतर स्टोक्सने सलग 5 बॉलमध्ये 5 सिक्स खेचले.
स्टोक्सने एकूण 88 बॉलमध्ये 161 धावा करुन आऊट झाला. स्टोक्सने या खेळीत 17 सिक्स आणि 8 फोर लगावले.