मुंबई: वेगवान गोलंदाज म्हणून जगात प्रसिद्ध असलेला इंग्लंडचा घातक गोलंदाज जोफ्रा आर्चर रिकव्हर होऊन पुन्हा मैदानात खेळायला उतरला आहे. मैदानात त्याने पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीनं कमाल दाखवण्यास सुरुवात केली. जोफ्राच्या घातक आणि गुगली गोलंदाजीसमोर भले भले फलंदाजीही जास्त काळ टिकत नाहीत. हे वाक्य पुन्हा एकदा खरं करून दाखवणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काउंटी इथे सकेक्स आणि सरे यांच्या विरुद्ध सामना सुरू आहे. सेकंड चॅम्पियनशिप सामन्यात आर्चरनं पुन्हा कमालीची कामगिरी केली आहे. त्याने टाकलेल्या गुगली बॉलमध्ये फलंदाज गोंधळला आणि तो एलबीडब्ल्यू आऊट झाला. जोफ्राच्या या गोलंदाजीवर फलंदाजाकडे काही उत्तर नव्हतं. त्याला निराश होऊन मैदान आऊट झाल्यानं सोडावं लागलं. 



जोफ्रानं ज्या पद्धतीनं या फलंदाजाला आऊट केलं त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. त्याची गोलंदाजी आणि आपण आऊट झालेलं पाहून फलंदाजही हैराण होऊन जोफ्राकडे पाहात राहिला. आपण आऊट झालो याचा विश्वास फलंदाजाला बसेना. अंपायरने आऊट दिल्यानंतर फलंदाजाने मैदान सोडलं.


सध्या जोफ्रा आर्चरला जगातील सर्वात धोकादायक वेगवान गोलंदाज म्हणणे चुकीचे ठरणार नाही. आर्चर सतत 150 किमी/ तासाच्या वेगाने गोलंदाजी करू शकतो. बहुतेक वेळा सर्वात मोठा फलंदाज त्याच्या बाउन्सरच्या चेंडूंवर जखमी होतो. जोफ्राला दुखापत होण्यापूर्वी भारता विरुद्ध इंग्लंड झालेल्या टी -20 सामन्यात केवळ 33 धावा देऊन त्याने 4 बळी घेतले होते.